ETV Bharat / sports

Tokyo Olympics आधी धावपटू द्युती चंदशी 'ईटीव्ही भारत'ची Exclusive बातचित - रिओ ऑलिम्पिक

मी फक्त हार्ड वर्क करू शकते. पण यश मिळणे हे माझ्या हातात नाही. पण मी चांगल्या परिणामाची आशा करते. जर मी चांगले प्रदर्शन करू शकले. तर सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल सहज गाठू शकते. मला माहित आहे की, माझ्याकडून देशवाशियांना सुवर्णपदकाची आशा आहे. यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल. मी कठोर परिश्रम घेईन, असे द्युती चंदने सांगितलं.

exclusive-lacked-experience-in-rio-well-prepared-now-says-dutee-ahead-of-tokyo-olympics
Tokyo Olympics आधी धावपटू द्युती चंदशी 'ईटीव्ही भारत'ची Exclusive बातचित
author img

By

Published : Jul 3, 2021, 7:49 PM IST

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत स्टार महिला धावपटू द्युती चंद १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे नेतृत्व करणार आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याआधी द्युती चंदशी 'ईटीव्ही भारत'ने फोनद्वारे संवाद साधला. संवादादरम्यान द्युतीने सराव, तिची तयारी याविषयी माहिती दिली.

द्युती म्हणाली की, 'मला माझ्यावर गर्व वाटतो. मी एकमात्र भारतीय धावपटू आहे, जिने जागतिक क्रमवारीच्या माध्यमातून १०० मीटर आणि २०० मीटर या दोन्ही स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. याआधी मी रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये पात्र ठरली होती. आता हे माझं दुसरे ऑलिम्पिक आहे. मी यासाठी खूप खुश आहे.'

मी फक्त हार्ड वर्क करू शकते. पण यश मिळणे हे माझ्या हातात नाही. पण मी चांगल्या परिणामाची आशा करते. जर मी चांगले प्रदर्शन करू शकले. तर सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल गाठू शकते. मला माहित आहे की, माझ्याकडून देशवाशियांना सुवर्णपदकाची आशा आहे. यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेल. मी कठोर परिश्रम घेईन, असेही देखील द्युती म्हणाली.

द्युती सद्या प्रशिक्षक रमेश नागापूरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. ती दिवसांतून ६ ते सात तास सराव करत आहे. ती पुढे म्हणाली, रिओ ऑलिम्पिकच्या वेळी मला फारसा अनुभव नव्हता. कारण मी त्याआधी फक्त पुण्यात राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती. पण त्यानंतर जगभरातील मोठमोठ्या जशा की, आशिया क्रीडा, विश्व चॅम्पियनशीप सारख्या स्पर्धा मी खेळल्या. या स्पर्धेच्या माध्यामातून मला बराच अनुभव मिळाला.

मला रिओ ऑलिम्पिकमध्ये जी कामगिरी करता आली नाही, ती मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये करण्याचा प्रयत्न करेन. रिओ ऑलिम्पिकच्या वेळी मला बऱ्याच बाबी माहित नव्हत्या. परंतु आता त्या मला माहित आहेत, याचा वापर मी पदक जिंकण्यासाठी करेन, असेही २५ वर्षीय द्युती म्हणाली.

दरम्यान, द्युती चंद भारताची स्टार महिला धावपटू आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून देशवाशियांना पदकाची आशा आहे.

हेही वाचा - Copa America : पराग्वेचा पेनाल्टी शूटआउटमध्ये धुव्वा उडवत पेरू उपांत्य फेरीत, आता गाठ गतविजेत्या ब्राझीलशी

हेही वाचा - WI VS PAK : सामना सुरू असताना विडींजचे २ खेळाडू अचानक मैदानावर कोसळले, स्ट्रेचरवरून नेले थेट रुग्णालयात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.