ETV Bharat / sports

Nikhat Zareen Interview : 'या' गोष्टीमुळे निखत बनली वर्ल्ड चॅम्पियन, आता नजर ऑलिम्पिक पदकावर... - बॉक्सर निखत झरीन

निखत झरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ( World Boxing Champion Nikhat Zareen ) सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीदरम्यान निखत आणि तिच्या वडिलांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. निखत म्हणाली, तिला पितृसत्ता आणि बॉक्सर्सना आव्हान द्यायचे आहे. तसेच ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे.

Nikhat Zareen
Nikhat Zareen
author img

By

Published : May 24, 2022, 6:20 PM IST

हैदराबाद: अलीकडेच तेलंगणातील 26 वर्षीय बॉक्सर निखत झरीनने ( Boxer Nikhat Zareen ) जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून जगात देशाची मान नाव उंचावली आहे. निखतने 52 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले. या प्रकारात तिने थायलंडच्या जितपाँग जुटामासचा 5-0 असा पराभव केला. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी निखत ही भारतातील पाचवी महिला बॉक्सर आहे. यापूर्वी लेखा केसी, जेनी आरएल, सरिता देवी आणि एमसी मेरी कोम या महिला बॉक्सरनी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. एमसी मेरी कोमने सहा वेळा हा पराक्रम केला आहे. निखत झरीन आणि त्याचे वडील मोहम्मद जमील अहमद यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली आहे.

संवादादरम्यान असे समजले की, एकदा निखतने वडिलांना विचारले होते की, निजामाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या क्रीडा मैदानात फक्त पुरुषच बॉक्सिंगला का जातात? तेव्हा तिचे वडील जमील अहमद यांनी निखतला सांगितले की, या खेळासाठी मेहनत आणि ताकदीची गरज आहे. मग निखतने विचारले की, मुली बॉक्सिंग करू शकत नाहीत का? त्यावेळी तिचे वडील म्हणाले होते, स्त्रिया पुरुषांच्या अधीन असतात, त्यांना हा खेळ खेळता येत नाही. वडिलांकडून हे ऐकून निखतने ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि आज जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन बनून दाखवले.

निखत जरीनचे वडील जमील अहमद यांच्याशी झालेल्या संभाषणातील काही भाग -

प्रश्न: निखतला बॉक्सिंगमध्ये रस असल्याचे तुम्हाला केव्हा समजले? आम्ही ऐकले की ती सुरुवातीला ऍथलेटिक्समध्ये होती...ती बॉक्सर कशी बनली?

उत्तरः उन्हाळ्याची सुट्टी होती. मी तिला कलेक्टरच्या खेळाच्या मैदानात घेऊन गेलो, जेणेकरून ती मैदानावर इतर मुलांसोबत वेळ घालवू शकेल. जर तिला एखाद्या खेळात रस असेल तर आपण तिला त्या खेळात सहभागी करून घेऊ शकतो. ती नियमितपणे येऊ लागली आणि आमच्या लक्षात आले की, तिच्यात क्रीडा क्षेत्रातील प्रतिभा आहे. तिने सुरुवातीला अॅथलेटिक्स 100 मीटर आणि 200 मीटरचे प्रशिक्षण सुरू केले, जे 4-5 महिने चालले. मैदानावर काही बॉक्सर देखील होते आणि ते खेळायचे आणि मग ती विचारायची 'पापा' बॉक्सिंग हा एक रोमांचक खेळ आहे. पण मुली का खेळत नाहीत? मी तिला म्हणालो, यासाठी खूप मेहनत आणि ताकदीची गरज आहे, ज्यावर तिने सांगितले की, तिला हा खेळ घ्यायचा आहे आणि हे सर्व तिथून सुरू झाले.

प्रश्न: आपण अशा समाजात राहतो जिथे पालकांना आपल्या मुलींना खेळात सहभागी करणे अवघड आहे. समाजापासून वाचण्यासाटी पालकांनी हिंमत दाखवली पाहिजे, तुम्ही त्याला कसे सामोरे गेले?

उत्तर : मी स्वतः एक खेळाडू होतो. तिला बॉक्सिंगमध्ये रस असल्याचे लक्षात आल्यावर मी तिला तिथे घेऊन गेलो आणि प्रशिक्षण सुरू केले. तिने चांगले काम करण्यास सुरुवात केली होती आणि लोक तिला पाहून मला विचारायचे की, मी त्याला बॉक्सिंग का खेळू दिले. ते माझ्या पाठीमागे माझ्यावर टीका करायचे आणि माझ्या मित्राला सुद्धा विचारायचे की निकतने बॉक्सिंग का घेतले आहे आणि इतर कोणताही खेळ का नाही? मी त्यांना सांगितले की ही आमची निवड आहे आणि आम्ही बाकीचे सर्व देवावर सोडले आहे. मी कधीच फारशी काळजी घेतली नाही. तिची विशाखापट्टणम येथील भारतीय शिबिरासाठी निवड झाली, जिथे ती एका प्रशिक्षण शिबिरासाठी गेली होती.

मात्र, त्यादरम्यान शॉर्ट्स आणि हाफ टी-शर्ट परिधान केल्याबद्दल तिच्यावर टीका आणि टिप्पणीही झाली होती. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो. कधी कधी तुम्ही फक्त धीर धरावा लागतो आणि आज माझी मुलगी सुवर्णपदक विजेती आहे. त्याचबरोबर काल जे लोक तिच्यावर टीका करत होते. ते आज अभिनंदन करत आहेत आणि निखतला भेटायची इच्छा व्यक्त करत आहेत.

प्रश्न: आपल्या मुलीचे करिअर घडवण्यात, विशेषत: खेळामध्ये वडीलांचा मोठा वाटा असल्याचे आपण पाहत आहोत. पीव्ही सिंधू, सायना नेहवाल आणि आता निखत. अनेक उदाहरणे आहेत. देशातील बाप-लेकींना तुमचा काय संदेश असेल?

उत्तरः भारतात सध्या अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे येत आहेत. आपल्या देशात खेळाडूचे पालक होणे सोपे नाही. मी त्या पालकांना एवढेच सांगेन की कोणाचेही ऐकू नका आणि तुमच्या मुलीला तिला हवे ते करू द्या. त्यांनी तिला पाठिंबा दिला पाहिजे, कारण खेळ त्यांना सक्षम करेल आणि त्यांना जीवनात पुढे नेईल.

प्रश्न: निखतसाठी तुमचे स्वप्न काय आहे?

उत्तरः ऑलिम्पिक पदक हे नेहमीच अंतिम स्वप्न असते. ती टोकियो ऑलिम्पिकला मुकली, पण आता आमची नजर पॅरिस ऑलिम्पिककडे आहे.

निखत झरीन सोबत झालेल्या संभाषणातील काही भाग -

प्रश्न: वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारे तुम्ही फक्त पाचवे भारतीय आहात? हे तुमच्यासाठी किती अर्थपूर्ण आहे?

उत्तर: होय, जागतिक चॅम्पियनशिपमध्ये हे पदक जिंकणारी मी एकमेव पाचवी भारतीय बॉक्सर आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. कारण बऱ्याच दिवसांनी मी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या विजयामुळे राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळ आणि पॅरिस ऑलिम्पिक यांसारख्या आगामी स्पर्धांसाठी माझा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

प्रश्न: तुम्ही एका वाईट टप्प्यातून गेला आहात. कोरोनाच्या काळात दुखापत झाली आणि अस्वस्थही झाले. ते किती कठीण होते आणि तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली?

उत्तर : माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. पण माझा स्वतःवर नेहमीच विश्वास होता. एक दिवस मी जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करेन, यावर माझा नेहमीच विश्वास होता. होय, दुखापतीनंतर माझ्या आयुष्यात बरेच काही घडले, परंतु त्या गोष्टींमुळे मला परत लढण्यासाठी बळ मिळाले आणि आता मी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकू शकली आहे. मी माझ्या आयुष्यात जेवढे कष्ट आणि त्यागांचा सामना केला, ते सर्व या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सार्थकी लागले.

प्रश्न: जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीबद्दल आम्हाला सांगा

उत्तर: माझी तयारी खूप चांगली होती. या स्पर्धेसाठी खरच मी खूप मेहनत घेतली होती.

हेही वाचा - IPL 2022 Updates : यंदाच्या हंगामात संजू सॅमसनने आपल्या नेतृत्वाने सर्वात जास्त प्रभावित केले - माजी खेळाडूचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.