लंडन - बीसीसीआयने बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. यामुळे अशी आशा केली जात आहे की, सद्याचे प्रमुख राहुल द्रविड यांना भविष्यात सीनियर संघाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. याशिवाय टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री टी-20 विश्व करंडक स्पर्धेनंतर प्रशिक्षणाठी उत्सुक नसल्याचे देखील वृत्त आहे. पण सूत्रांच्या मते, याविषयी सद्याच्या घडीला बोलणे थोडेसे घाईचे ठरेल.
एएनआयशी बोलताना बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं की, इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, बीसीसीआयचे अधिकारी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि खेळाडूंशी चर्चा करणार आहे. या दरम्यान, जर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्याचा कारभार पुढे कायम ठेवण्यात इच्छुक नसतील तर पुढील रणणितीवर चर्चा केली जाणार आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांच्या मते, यामुद्यावर बोलणे थोडेसे घाईचे ठरेल. आज बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष, सचिव जय शाह हे लंडनला पोहोचणार आहे. सर्व अधिकारी लॉर्ड्स कसोटी दरम्यान प्रशिक्षक रवी शास्त्री आणि टीम इंडियाची भेट घेत पुढील रणणितीवर चर्चा करणार आहेत. जर रवी शास्त्री आपल्या पदावर कायम राहण्यास इच्छुक नसतील तर लॉर्ड्स कसोटी दरम्यान यावर चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, सद्याच्या घडीला राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहेत. पण शास्त्री गेल्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविड यांनी सांभाळली होती. यावेळी त्यांनी मुख्य प्रशिक्षक होण्याबद्दल सद्या काही विचार केला नसल्याचे सांगितलं होतं. मला जी जबाबदारी दिली. ती मी पुर्ण केली असल्याचे देखील द्रविड म्हणाले होते.
बीसीसीआयने एनसीए प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट आहे. बीसीसीआयमधील सूत्रांच्या मते, द्रविड या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. दरम्यान, टी-20 विश्व करंडक संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये रवी शास्त्रींच्या कार्यकाल संपणार आहे. अशात राहुल द्रविड यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.
हेही वाचा - Ind vs Eng 2nd Test, PREVIEW: शार्दुल ठाकूरला दुखापत, अश्विनला मिळणार संधी?
हेही वाचा - Ind vs Eng : इंग्लंडच्या धाकड फलंदाजाने केलं जसप्रीत बुमराहचे कौतुक, म्हणाला...