ETV Bharat / sports

Hockey Match Players Scuffled : हॉकी सामन्यात गोंधळ, लाइव्ह सामन्यात खेळाडूंची बाचाबाची - commonwealth games 2022 fight

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या हॉकी सामन्यात कॅनडाचा बलराज पानेसर आणि इंग्लंडचा ख्रिस ग्रिफिथ यांच्यात वाद पाहायला ( Players Scuffled in live match ) मिळाला. यानंतर रेफ्रींनी कॅनडाच्या बलराज पानेसरला रेड कार्ड ( Red card to Balraj Panesar ) दाखवून बाहेर पाठवले. त्याचवेळी ग्रिफिथला पिवळे कार्ड ( Yellow card to Griffiths ) दाखवून ताकीद देण्यात आली.

CWG 2022
CWG 2022
author img

By

Published : Aug 5, 2022, 3:54 PM IST

बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) मध्ये गुरुवारी इंग्लंड आणि कॅनडा यांच्यात पुरुषांचा हॉकी सामना झाला. या सामन्यादरम्यान दोन खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. ही लढत पाहून प्रेक्षकही अवाक् झाले. वाद इतका वाढला की रेफ्रींना हस्तक्षेप करावा लागला. या सामन्यादरम्यान कॅनडाचा बलराज पानेसर आणि इंग्लंडचा ख्रिस ग्रिफिथ ( England player Chris Griffiths ) यांनी एकमेकांची मान पकडली आणि मैदानावरच भिडले.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडला मोठ्या फरकाने विजय मिळवायचा होता. यासाठी इंग्लंड संघाचे खेळाडू कॅनडाविरुद्ध गोल करण्यासाठी सतत आक्रमक खेळ दाखवत होते. त्यानंतर कॅनडाचा खेळाडू बलराज पानेसरची ( Canadian player Balraj Panesar ) हॉकी स्टिक इंग्लंडच्या ग्रिफिथच्या हाताला लागली आणि ती अडकली. यामुळे इंग्लिश खेळाडू संतप्त झाला आणि त्यांनी पानेसरला धक्काबुक्की ( Controversy between Griffiths and Panesar ) केली. त्यामुळे पानेसर संतापला आणि त्याने ग्रिफिथची मान पकडली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचा टी-शर्ट पकडला आणि ओढण्यास सुरुवात केली.

त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी येऊन दोघांना वेगळे केले. यानंतर रेफ्रींनी कॅनडाच्या बलराज पानेसरला रेड कार्ड ( Red card to Balraj Panesar ) दाखवून बाहेर पाठवले. त्याचवेळी ग्रिफिथला पिवळे कार्ड ( Yellow card to Griffiths ) दाखवून ताकीद देण्यात आली. इंग्लंडने हा सामना 11-2 ने जिंकला, पण तरीही संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना 15 गोलच्या फरकाने विजय हवा होता.

हेही वाचा -World Under 20 Athletics : जागतिक 20 वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकणारी रूपल ठरली पहिली भारतीय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.