ETV Bharat / sports

CWG 2022: भारताच्या रवी दहियाने कुस्तीत सुवर्ण जिंकले, देशाला 10 वे सुवर्ण - Wrestling

भारताच्या रवी दहियाने 57 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने नायजेरियाच्या अबिकवेनिमो वेल्सनचा 10-0 असा पराभव केला. तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर त्याने हा अंतिम सामना जिंकला. ( Ravi Dahiya won gold medal ) ( Commonwealth Games 2022 )

Ravi Dahiya won gold medal
भारताच्या रवी दहियाने कुस्तीत सुवर्ण जिंकले, देशाला 10 वे सुवर्ण
author img

By

Published : Aug 6, 2022, 10:39 PM IST

बर्मिंगहॅम : भारताचा स्टार कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. त्याचे पहिले पदक सुवर्ण आहे. रवीने फ्रीस्टाइल ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या अबिकवेनिमो विल्सनचा १०-० असा पराभव केला. ( Ravi Dahiya won gold medal ) ( Commonwealth Games 2022 )

कुस्तीतील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. त्याचबरोबर या खेळातील एकूण पदकांची संख्या आठ झाली आहे. रवीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर त्याचे सुवर्णपदक हुकले, पण यावेळी त्याने कोणतीही चूक केली नाही. रवीपूर्वी दीपक पुनिया, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी बर्मिंगहॅममध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकावले आहे.

भारताचे पदक विजेते

  • 10 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया
  • 11 रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ
  • 11 कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.