ETV Bharat / sports

Boxing Day Test : 'बॉक्सिंग डे'निमित्त रंगणार सामने; ऑस्ट्रेलियाची वि. दक्षिण आफ्रिका, तर पाकिस्तानची न्यूझीलंडशी लढत

'बॉक्सिंग डे' कसोटीनिमित्त ( Boxing Day Test Match ) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका ( Boxing Day Test match 26th December History ) यांच्यातील दुसरा ( Shane Warne ) कसोटी सामना आजपासून सुरू झाला आहे. ज्यामध्ये दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नलाही ( Shane Warne ) श्रद्धांजली वाहण्यात आली. तर दुसरीकडे पाकिस्तानची लढत न्यूझीलंडशी होणार ( Two Match Series Between Pakistan and New Zealand ) आहे.

Boxing Day Test match 26th December History South Africa vs Australia Melbourne Cricket Ground
ऑस्ट्रेलियाची लढत दक्षिण आफ्रिकेशी तर पाकिस्तानची न्यूझीलंडशी लढत, जाणून घ्या 'बॉक्सिंग डे' म्हणजे नेमके काय
author img

By

Published : Dec 26, 2022, 6:12 PM IST

नवी दिल्ली : आजपासून मेलबर्नमध्ये ( Boxing Day Test Match ) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका ( South Africa vs Australia ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला ( Boxing Day Test match 26th December History ) आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बॉक्सिंग डे कसोटीसाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) प्रेक्षकांनी खचाखच भरले ( Shane Warne ) आहे. याशिवाय पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून कराची येथे होणार ( Two Match Series Between Pakistan and New Zealand ) आहे. दोन्ही सामने 'बॉक्सिंग डे'ला (२६ डिसेंबर) सुरू होत आहेत.

दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला श्रद्धांजली ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंनी बॉक्सिंग डे कसोटीत राष्ट्रगीतादरम्यान फ्लॉपी टोपी घालून दिवंगत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू आणि महान खेळाडू शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. याच वर्षी मार्चमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शेन वॉर्न अवघा ५२ वर्षांचा होता. वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.

'बॉक्सिंग डे' टेस्ट म्हणजे काय ते जाणून घेऊया 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला 'बॉक्सिंग डे' म्हणतात. 'बॉक्सिंग डे' अशा लोकांना समर्पित आहे, जे ख्रिसमसच्या दिवशीही सुटी न घेता कर्तव्यावर असतात. या दिवशी अशा लोकांना गिफ्ट बॉक्स देऊन प्रोत्साहन दिले जाते. या कारणास्तव, ख्रिसमसनंतरचा दिवस 'बॉक्सिंग डे' म्हणून ओळखला जाऊ लागला.

1892 मध्ये 'बॉक्सिंग डे'ला पहिला सामना 'बॉक्सिंग डे'ला क्रिकेटशिवाय इतर खेळांचे सामनेही खेळवले जातात. अनेक वेळा इंग्लिश प्रीमियर लीग, स्कॉटिश प्रीमियर लीगचे सामने 'बॉक्सिंग डे'वरही झाले आहेत. क्रिकेटमध्ये प्रथमच बॉक्सिंग डे सामना 1892 साली ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत खेळला गेला. हा सामना शेफिल्ड शिल्ड या ऑस्ट्रेलियन देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेसाठी खेळला गेला.

1950 मध्ये ऑस्ट्रेलियात प्रथमच 'बॉक्सिंग डे' कसोटी आयोजित पहिली 'बॉक्सिंग डे' कसोटी 1950 साली मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे खेळली गेली. 1980 पासून ऑस्ट्रेलियन संघ मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 'बॉक्सिंग डे' कसोटी खेळत आहे. (टीप- 1989 मध्ये मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डेवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता). ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या संघांनाही बॉक्सिंग डेवर सामने खेळायला आवडतात.

भारतानेही अनेक सामने खेळले आहेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 9 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. हे नऊ कसोटी सामने 1985, 1991, 1999, 2003, 2007, 2011, 2014, 2018 आणि 2020 मध्ये खेळले गेले. यादरम्यान भारतीय संघाने केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पाच सामने जिंकले तर दोन सामने अनिर्णित राहिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.