मुंबई - बॉडी बिल्डर सेंथिल कुमारन सेलवारजन याचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याने छोट्या वयात बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामधून आपलं नाव कमावलं होतं. मिस्टर इंडियासह त्याने २०१६ मध्ये मिस्टर आशियाई आणि २०१९ मध्ये मिस्टर वर्ल्डचा किताब पटकावला होता.
सेंथिल कुमारन हा मूळचा तमिळनाडूचा होता. २०१३ मध्ये शेरू क्लासिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकून त्याने मिस्टर इंडियाचा किताब पटकवला होता. पिळदार शरीर आणि आकर्षक बॉडीतील आपले फोटो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायचा. यामुळे तो नेहमी चर्चेत असायचा. त्याचे इन्स्टाग्रामवर २० हजाराहून अधिक फॉलोवर्स होते. यावरुनचा त्याच्या लोकप्रियतेची प्रचिती येते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सेंथिल कुमारन सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरुन आपल्या चाहत्यांना बॉडी बिल्डिंगच्या टिप्स द्यायचा. दरम्यान, हृदविकाराच्या झटक्याने सेंथिल कुमारनचा मृत्यू झाल्याने त्याच्या चाहत्या वर्गाला चांगलाच धक्का बसला आहे.
इंडियन बॉडी बिल्डिंगने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून सेंथिल कुमारन याला श्रद्धांजली वाहिली आहे. यात त्यांनी, सेंथिल कुमारन हा भारतातील उत्कृष्ट बॉडी बिल्डर्सपैकी एक होता. तो कमी वयात आपल्या सोडून गेला, असे म्हटलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - मेरी कोमसह ९ महिला बॉक्सिंगपटू ट्रेनिंगसाठी येणार पुण्यात
हेही वाचा - छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या खूनाप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमार दिल्ली पोलिसांच्या रडावर