ETV Bharat / sports

प्रो कबड्डी : आज बेंगळुरु बुल्सचा गुजरात फॉर्च्युन जायंट्सशी तर, तेलुगू टायटन्सचा तमिळ थलायव्हाशी सामना

आज रंगणारा पहिला सामना 7.30 ला तर दुसरा सामना 8.30 ला सुरु होईल.

प्रो कबड्डी : आज बेंगळूरु बुल्सचा गुजरात फॉर्च्यूनजायंट्सशी तर, तेलुगू टायटन्सचा तमिळ थलायव्हा संघाशी सामना
author img

By

Published : Jul 21, 2019, 8:39 AM IST

Updated : Jul 21, 2019, 10:39 AM IST

हैदराबाद - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा धुव्वा उडवला तर दुसऱ्या सामन्यात बेंगळुरु बुल्सने पाटना पायरेट्सचा 2 गुणांनी पराभव केला. आज रविवारी या स्पर्धेत पहिला सामना विजयी झालेल्या बंगळुरु बुल्सचा गुजरात फॉर्च्युन जायंट्सशी तर दुसरा सामना तेलुगू टायटन्सचा तमिळ थलायव्हा संघाशी होणार आहे.

आज रंगणारा पहिला सामना 7.30 ला तर दुसरा सामना 8.30 ला सुरु होईल. या पर्वात गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा संघ सुनीलकुमारच्या तर तमिळ थलायव्हाचा संघ अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मैदानात उतरेल.

कालच्या सामन्यात यू मुंबाच्या संघाने तेलुगू टायटन्सला 8 गुणांनी हरवले. यू मुंबाच्या संघाने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. पहिल्या हाफमध्ये यू मुंबाच्या कर्णधार फझल अत्राचलीने चांगला बचाव केला. तर, दुसरीकडे यू मुंबाची साथ सोडून तेलुगू टायटन्ससोबत जोडला गेलेला मागील हंगामातील स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई अपेक्षित कामगिरी करु शकला नाही.

तर दुसरीकडे, हैदराबादच्या गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये शेवटपर्यंत रंगलेल्या कालच्या अटातटीच्या सामन्यात बेंगळूरु बुल्सने तीन वेळा चॅम्पियन असलेल्या पाटणा पायरेट्सचा 2 गुणांनी पराभव केला. पहिल्या हाफमध्ये बेंगळूरु बुल्सचा संघ 4 गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये बुल्सच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. बंगळुरुचा संघ पहिल्या हाफमध्ये 17-13 ने पिछाडीवर होता. पण, दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी चांगला खेळ करत सामन्यात 34-32 ने पाटणा पायरेट्सचा पराभव केला.

Intro:Body:

प्रो कबड्डी : आज बेंगळूरु बुल्सचा गुजरात फॉर्च्यूनजायंट्सशी तर, तेलुगू टायटन्सचा तमिळ थलायव्हा संघाशी सामना

हैदराबाद - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा धुव्वा उडवला तर दुसऱ्या सामन्यात बेंगळूरु बुल्सने पाटना पायरेट्सचा 2 गुणांनी पराभव केला. आज रविवारी या स्पर्धेत पहिला सामना विजयी झालेल्या बेंगळूरु बुल्सचा गुजरात फॉर्च्यूनजायंट्सशी तर दुसरा सामना तेलुगू टायटन्सचा तमिळ थलायव्हा संघाशी होणार आहे.

आज रंगणारा पहिला सामना 7.30 ला तर दुसरा सामना 8.30 ला सुरु होईल. या पर्वात गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचा संघ सुनीलकुमारच्या तर तमिळ थलायव्हाचा संघ अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मैदानात उतरतील.

कालच्या सामन्यात यू मुंबाच्या संघाने तेलुगू टायटन्सला 8 गुणांनी हरवले. यू मुंबाच्या संघाने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. पहिल्या हाफमध्ये यू मुंबाच्या कर्णधार फझल अत्राचलीने चांगला बचाव केला. तर, दुसरीकडे यू मुंबाची साथ सोडून तेलुगू टायटन्ससोबत जोडला गेलेला मागील हंगामातील स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई अपेक्षित कामगिरी करु शकला नाही.

तर दुसरीकडे, हैदराबादच्या गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये  शेवटपर्यंत रंगलेल्या कालच्या अटातटीच्या सामन्यात बेंगळूरु बुल्सने तीन वेळा चॅम्पियन असलेल्या पाटणा पायरेट्सचा 2 गुणांनी पराभव केला. पहिल्या हाफमध्ये बेंगळूरु बुल्सचा संघ 4 गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये बुल्सच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. बेंगळूरुची संघ पहिल्या हाफमध्ये 17-13 ने पिछाडीवर होता. पण, दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी चांगला खेळ करत सामन्यात 34-32 ने पाटणा पायरेट्सचा पराभव केला.

Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.