दोहा: बेल्जियमचा मिडफिल्डर केविन डी ब्रॉयनाला (Kevin De Bruyne) माहित होते की तो त्याच्या संघाच्या पहिल्या विश्वचषक सामन्यात चांगला खेळू शकला नाही. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना तो म्हणाला, "मला सामनावीराचा पुरस्कार का मिळाली ते माहित नाही, कदाचित तो मला माझ्या नावामुळे मिळाला असेल." (Belgium vs Morocco preview)
'गोल्डन एज' साठी शेवटचा विश्वचषक : कॅनडावर 1-0 च्या अप्रतिम विजयानंतर बेल्जियमला रविवारी मोरोक्कोविरुद्ध ते जगातील क्रमांक 2-रँकिंगचा संघ का आहेत हे दाखवण्याची संधी आहे. उच्च दर्जाच्या बेल्जियन संघातील अनेकांसाठी हा शेवटचा विश्वचषक असू शकते. बेल्जियमच्या 'गोल्डन एज' मधील डी ब्रॉयना, एडन हझार्ड, एक्सेल विट्सेल, जॅन व्हरटोन्घेन, टोबी अल्डरवेरल्ड आणि गोलकीपर थिबॉट कोर्टोइस हे आता सर्वजण वयाच्या तिशीत आहेत.
लुकाकूचे पुनरागमन? : प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी सांगितले की कॅनडाविरुद्धची त्यांची कामगिरी ते बेल्जियमचे कोच असल्यापासून सर्वात वाईट होती. ते मोरोक्कोविरुद्ध नवीन चेहऱ्यांना संधी देवू शकतात. मार्टिनेझला दिग्गज स्ट्रायकर रोमेलू लुकाकूला संघात परत आणायचे आहे. तो डाव्या मांडीच्या दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. बेल्जियम मीडियाने अहवाल दिला आहे की बेल्जियमचा हा विक्रमी गोल-स्कोअरर दोहा येथील अल थुमामा स्टेडियमवर मोरक्को विरुद्ध अपेक्षेपेक्षा लवकर पुनरागमन करू शकतो.
मोरोक्कोचा आत्मविश्वास उंचावलेला: लुका मॉड्रिक सारख्या जगातील सर्वोत्तम मिडफिल्डरला टक्कर देणाऱ्या डी ब्रॉयनला रोखण्याचा प्रयत्न मोरोक्को करेल. 2018 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील क्रोएशिया सोबत 0-0 असा बरोबरीत सुटणे ही मोरोक्कोसाठी विश्वचषकाची आशादायक सुरुवात होती. विशेषत: प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांच्याकडे संघाला तयार करण्यासाठी तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी होता. त्यांनी विश्वचषकात प्रवेश करण्यापूर्वी केवळ तीन मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये मोरोक्कोचे प्रशिक्षकपद भूषवले होते.