नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज ऋषभ पंत एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे. (Rishabh Pant Accident) ऋषभ हा दिल्लीहून रुरकी येथील आपल्या घराकडे जात असताना वाटेत त्याच्या कारला अपघात झाला. (Dinesh Karthik Tweet on Rishabh Pant ) सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली असून ते लवकरात लवकर बरे होण्याच्या प्रार्थना करत आहेत. (Karthik Tweet on Rishabh Pant Car Acciden) अशा परिस्थितीत त्याचा सहकारी दिनेश कार्तिकने पंतच्या चाहत्यांना तसेच लोकांना आवाहन केले आहे.
दिनेश कार्तिकने चाहत्यांना आयुष्याच्या या सर्वात कठीण टप्प्यात त्याला जागा आणि देण्याची विनंती करत ट्विटरवर लिहिले की, (Dinesh Karthik Tweet on Rishabh Pant ) एक माणूस म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की कृपया त्याचे दुखापती आणि पट्ट्या असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, आणि जागा द्या आणि त्याच्या कुटुंबाला धीर द्या.
भारताचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या सहकाऱ्यासोबत झालेल्या (Dinesh Karthik Tweet on Rishabh Pant ) अपघातानंतर शोक व्यक्त करत चाहत्यांना आवाहन केले आहे. जखमी क्रिकेटपटू ऋषभ पंतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, असे आवाहन कार्तिकने केले आहे. त्याने चाहत्यांना या सर्वात कठीण काळात त्याला जागा आणि देण्याची विनंती केली आहे.
त्याचवेळी, अपघातानंतर, बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांनी एक ट्विट तसेच मीडिया स्टेटमेंट जारी करून त्यांच्या बरे होण्यासाठी तसेच त्यांच्या चांगल्या उपचारांसाठी शक्य ती सर्व मदत केली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, तो स्वतः त्याची मर्सिडीज बेंझ जीएलसी कूप चालवत घरी जात होता. अपघातानंतर गाडीची अवस्था पाहून लोक महागड्या आलिशान वाहनांच्या दर्जाचीही चर्चा करत आहेत.