ETV Bharat / sports

Pro Kabaddi League : बंगळुरु बुल्स आणि यूपी योद्धा उपांत्य फेरीत दाखल ; उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या पर्वातील ( Pro Kabaddi League ) उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांची नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये पटना पायरेट्स, दबंग दिल्ली, यूपी योद्दा आणि बंगळुरु बुल्स संघाचा समावेश आहे. बंगळुरु बुल्सने गुजरात जायंट्सचा आणि यूपी योद्धाने पुणेरी पलटनचा पराभव करत उपांत्य धडक दिली आहे.

pkl
pkl
author img

By

Published : Feb 22, 2022, 5:09 PM IST

बंगळुरु : प्रो कबड्डी लीगचे आठवे पर्व ( Pro Kabaddi League Season Eight ) अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेचा थरार आणखीनच रंगतदार होताना दिसत आहे. सोमवारी या स्पर्धेचा दुसरा एलिमिनेटर सामना खेळला गेला. हा सामना बंगळुरु बुल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात बंगळुरु बुल्सने 49-29 अशा फरकाने गुजरात जायंट्स संघाचा पराभव केला. त्याचबरोबर आता सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे.

  • 𝕊𝔼𝕄𝕀-𝔽𝕀ℕ𝔸𝕃𝕊 𝔸ℝ𝔼 𝔽𝕀ℕ𝔸𝕃𝕃𝕐 ℍ𝔼ℝ𝔼 🤩

    🎬 Semi-final 1: Pirates 🆚 Record-Breaker & co.
    🎬 Semi-final 2: Naveen Express & co. 🆚 Hi-Flyer & the Bulls

    Which two teams will battle it out for the #VIVOProKabaddi 🏆❓#SuperhitPanga pic.twitter.com/sAHR2NJZ4E

    — ProKabaddi (@ProKabaddi) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंगळुरु बुल्स संघाच्या विजयात स्टार रेडर पवन सेहरावत ( Star Raider Pawan Sehrawat ) महत्वाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात सर्वाधिक 13 गुण मिळावले. त्याचबरोबर चंद्रन रंजीत (7) आणि भरत (6) यांच्या व्यतिरिक्त बचावात महेंदरने (2 सुपर टॅकल बरोबर हाई-5) महत्वपूर्ण योगदान दिले. गुजरातच्या डिफेंसने या सामन्यात निराशाजनलक कामगिरी करताना फक्त 5 गुण मिळवले. त्याचबरोबर त्यांच्या रेडरनेसुद्धा समाधानकारक कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांचा 20 गुणांनी पराभव झाला.

दरम्यान पहिल्या हाफटाइम पर्यंत बंगळुरु बुल्सचा संघ 24-17 ने आघाडीवर होता. या सामन्यात गिरीष एर्नाकने ( Defender Girish Ernak ) बचावात बऱ्याच चूका केल्या याचा फटका गुजरात जायंट्स संघाला बसला. त्याचबरोबर या संघाला चढाईत सु्द्धा यश मिळवता आले नाही. त्यामुळे गुजरात जायंट्स संघाचे ( Gujarat Giants Team ) आव्हान प्लोऑफच्या सामन्यातच संपुष्टात आले.

तसेच दुसरा प्लोऑफचा सामना यूपी योद्धा आणि पुणेरी पलटन संघात ( Puneri Paltan Team ) खेळला गेला. या सामन्यात यूपी योद्धा 42-31 अशा फरकाने पुणेरी पलटनचा पराभव करत सेमीफायनलची फेरी गाठली. त्यामुळे आता सेमीफायनल सामन्यात कोणत्या चार संघात लढत होणार आहे, हे निश्चित झाले आहे. यामध्ये दबंग दिल्ली, यूपी योद्धा, बंगळुरु बुल्स आणि पटना पायरेट्स या चार संघाचा समावेश आहे.

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या पर्वातील सेमीफायनलचे दोन्ही सामने बुधवारी (23 फेब्रुवारी ) होणार आहे. यातील पहिला सामना पटना पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा ( UP Warriors against Patna Pirates ) यांच्यात खेळला जाईल. हा सामना रात्री साडेसातला सुरु होईल. दुसरा सामना दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरु बुल्स ( Dabangg Delhi vs Bangalore Bulls ) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला रात्री साडे आठला सुरु होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.