नवी दिल्ली - राष्ट्रीय स्तरावरील माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांची मुलगी बबीता फोगट यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश करण्यात आला.
-
Delhi: Wrestler Babita Phogat and her father Mahavir Singh Phogat join Bharatiya Janata Party in the presence of Union Minister Kiren Rijiju. pic.twitter.com/p4itp7hxMX
— ANI (@ANI) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: Wrestler Babita Phogat and her father Mahavir Singh Phogat join Bharatiya Janata Party in the presence of Union Minister Kiren Rijiju. pic.twitter.com/p4itp7hxMX
— ANI (@ANI) August 12, 2019Delhi: Wrestler Babita Phogat and her father Mahavir Singh Phogat join Bharatiya Janata Party in the presence of Union Minister Kiren Rijiju. pic.twitter.com/p4itp7hxMX
— ANI (@ANI) August 12, 2019
यापूर्वी बबीता फोगट यांनी जननायक जनता पार्टी (जेजेपी) साठी प्रचार केला होता. महावीर फोगट हे जेजेपी स्पोर्ट्स सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी महावीर फोगट यांचे कौतूक केले. ते म्हणाले, 'फोगट यांनी अनेक कुस्तीपटू घडवले आहेत. पक्षासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या दोन कुस्तीपटूंनी हा निर्णय घेतला आहे.'
या वर्षाच्या अखेरीस हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. या पक्षप्रवेशाबद्दल महावीर फोगट यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'भाजपने कलम 370 रद्द करून खूप चांगले काम केले आहे.'
बबीता कुमारीने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या काश्मीरविषयीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. बबीताने त्या वक्तव्यात काहीही अपमानजनक नाही असे म्हटले आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कलम ३७० रद्द केल्यानंतर 'तिथल्या महिलांशी आता लग्न करता येऊ शकते' असे म्हटले होते.