नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक-२०२१ पूर्वी बंदीची मुदत संपणारे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतात, असे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी-वाडाचे अध्यक्ष विटॉल्ड बांका म्हणाले आहेत. यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केले गेले होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलले गेले.
वाडाच्या या निर्णयामुळे भारतीय कुस्तीपटू नरसिंह यादव पुढच्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार आहे. यावर्षी ऑलिम्पिकचे आयोजन झाले असते तर, बंदीमुळे नरसिंह त्यामध्ये सहभागी होऊ शकला नसता.
‘ही बंदी काही काळासाठी आहे. ही ठोस क्रीडा स्पर्धेस समर्पित नाही. जेव्हा आपण आपली शिक्षा पूर्ण करता तेव्हा खेळू शकता. कायदेशीर दृष्टिकोनातून आम्ही शिक्षा वाढवू शकत नाही’, असे बांका यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.