दुबई - अशियाई युवा चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूंनी दमदार कामगिरी केली. विश्व युवा स्पर्धेचा कास्य पदक विजेता विश्वमित्र चोंगथाम (51 किलो) सह भारताचे तीन बॉक्सिंगपटू अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
विश्वमित्र चोंगथाम याने उपांत्य फेरीत ताजिकिस्तानच्या बॉक्सिंगपटूचा धुव्वा उडवला. त्याने हा सामना 5-0 असा एकतर्फा जिंकत अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला.
सुरेश विश्वनाथ (48 किलो) आणि जयदीप रावत (57 किलो) हे देखील अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
सुरेश विश्वनाथ याने बहरीनच्या फदेल सय्यद हिचा 5-0 ने पराभव केला. तर जयपीद रावतने किर्गीस्तानच्या बेकबोल मुरास्बेकोव याचा 3-2 ने पराभव करत अंतिम फेरी गाठली.
लाशु यादव (70 किलो), दीपक (75) यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला. यामुळे त्यांना कास्य पदकावर समाधान मानावे लागले. लाशु यादवचा कझाकिस्तानच्या गौखार शायबेकोवा याने 5-0 ने पराभव केला. तर दीपकला कझकिस्तानच्या आलियासकारोव बाकबेरगन याने 4-1 ने नमवले.
ज्यूनियर आणि युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे आतापर्यंत 35 हून अधिक पदक झाले आहेत. दरम्यान, कोरोना महामारीमुळे कमी संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. भारताचे 20 पदक ड्रॉच्या दिवशीच पक्के झाले होते.
हेही वाचा - 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं, जाणून घ्या प्रकरण
हेही वाचा - टोकियो पॅरालिम्पिक 2020 : पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू उपांत्यफेरीत; भाविना पटेलची कामगिरी