हैदराबाद : Asian Games २०२३ : भारतानं यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघानं विश्वविक्रम नोंदवत पहिलं सुवर्णपदक जिंकलंय. यामुळं आशियाई गेम्समधील भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णकामगिरीनं झालीय. रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंग पनवार आणि ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर यांचा समावेश असलेल्या संघानं चीनचा विक्रम एका अंशानं (०.४ गुण) मागे टाकून जागतिक विक्रमाची नोंद केलीय. वैयक्तिक पात्रता फेरीत या तिघांनी एकूण १८९३.७ गुण नोंदवत सांघिक स्पर्धेसाठी सुवर्णपदक जिंकलंय. बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीननं मागील महिन्यात केलेल्या जागतिक विक्रमाच्या तुलनेत भारताय नेमबाजांनी केलेला एकत्रित स्कोअर 0.4 गुणांनी अधिक होता.
रोईंगमध्ये भारताला कांस्यपदक : भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आणखी एक पदक मिळालंय. जसविंदर सिंह, आशिष, पुनीत कुमार आणि भीम सिंह यांनी रोईंगच्या पुरुषांच्या कॉक्सलेस फोर स्पर्धेत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलंय. भारताच्या बलराज पनवारचं मात्र रोईंगमधील पदक थोडक्यात हुकलं. त्यानं पुरुष एकेरी स्कल्सच्या अंतिम फेरीत चौथं स्थान पटकावलं. या स्पर्धेत चीननं सुवर्ण, जपाननं रौप्य आणि हाँगकाँगनं कांस्यपदक जिंकलंय.
भारताच्या खात्यात एकूण सात पदकं :
- मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता जिंदल : 10 मीटर एयर रायफल टीम इव्हेंट (नेमबाजी): रौप्यपदक
- अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह, मेन्स लाईटवेट डबल स्कल्स (रोईंग): रौप्यपदक
- बाबू लाल आणि लेख राम, मेन्स कॉक्सलेस डबल्स : (रोईंग) : कांस्यपदक
- मेन्स कॉक्स्ड 8 टीम : (रोईंग) : सिल्वर
- रमिता जिंदल-वूमन्स 10 मीटर एयर रायफल (शुटिंग) : कांस्यपदक
- ऐश्वर्य तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पंवार, 10 मीटर एयर रायफल टीम इव्हेंट (नेमबाजी) : सुवर्णपदक
- आशीष, भीम सिंह, जसविंदर सिंह आणि पुनित कुमार-मेन्स कॉक्सलेस 4 (रोईंग) : कांस्यपदक
महिला क्रिकेट संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा : भारतीय महिला क्रिकेट संघानं काल बांगलादेशला धुळ चारत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश घेत पदक निश्चित केलय. मात्र भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय महिला क्रिकेट संघही सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
हेही वाचा :