जकार्ता: आशिया कप हॉकी 2022 ( Asia Cup Hockey 2022 ) स्पर्धेतील अ गटातील सामना भारत विरुद्ध जपान संघात झाला. या सामन्यात जपानने भारताचा 5-2अशा फरकाने पराभव ( Japan beat India 5-2 ) केला. जपानचा हा सलग दुसरा विजय आहे, त्यामुळे भारताला अजून विजयाचे खाते उघडता आले नाही. भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध अनिर्णीत राहिला होता.
जपानने आपल्या पहिल्या सामन्यात इंडोनेशियाचा 9-0 असा पराभव केला. तर भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानसोबत 1-1 अशी बरोबरी साधली होती. भारताकडून फक्त पवन राजभर आणि उत्तम सिंग यांनी गोल केले. भारतासाठी राजभरने 45व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर उत्तम सिंगने 50व्या मिनिटाला दुसरा गोल केला.
-
Some 📸 from our clash against Japan in the Hero Asia Cup 2022, which took place at the GBK Hockey field in Jakarta, Indonesia.#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #INDvsJPN #matchday @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/3NvPFZmxr4
— Hockey India (@TheHockeyIndia) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Some 📸 from our clash against Japan in the Hero Asia Cup 2022, which took place at the GBK Hockey field in Jakarta, Indonesia.#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #INDvsJPN #matchday @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/3NvPFZmxr4
— Hockey India (@TheHockeyIndia) May 24, 2022Some 📸 from our clash against Japan in the Hero Asia Cup 2022, which took place at the GBK Hockey field in Jakarta, Indonesia.#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #INDvsJPN #matchday @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/3NvPFZmxr4
— Hockey India (@TheHockeyIndia) May 24, 2022
तसेच जपानकडून केन नागयोशीने 24व्या मिनिटाला आणि कोसे कावाबेने 40व्या आणि 56व्या मिनिटाला दोन गोल केले. कोजी यामासाकीने 50 व्या मिनिटाला चौथा गोल केला. ओका र्योमाने 49व्या मिनिटाला संघासाठी तिसरा गोल केला. तसेच इतर सामन्यात बांगलादेशने ओमानचा 2-1, तर पाकिस्तानने इंडोनेशियाचा 13-0 असा पराभव केला. अटीतटीच्या लढतीत मलेशियाने कोरियाचा 5-4 असा पराभव केला.