मनिला (फिलीपिन्स): लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने ( Saina Nehwal ) बुधवारी बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमधील पहिल्या फेरीचा सामना जिंकला, परंतु लक्ष्य सेन ( Lakshya Sen ) आणि बी साई प्रणीत ( B Sai Praneet ) पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडले. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या सायनाने दक्षिण कोरियाच्या सिम युजिनचा 21-15, 17-21, 21-13 असा पराभव केला.
जागतिक चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता लक्ष्य मात्र बिगरमानांकित चीनच्या ली शी फेंगविरुद्धच्या उलटफेरचा बळी ठरला. 56 मिनिटे चाललेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित भारतीयाला फॅंगकडून 21-12, 10-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या प्रणीतलाही पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून 17-21, 13-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
-
Day 2 Smart Badminton Asia Championships 2022: Results Update
— Badminton Asia (@Badminton_Asia) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Women's Singles
Saina Nehwal 🇮🇳 vs Sim Yujin 🇰🇷 : 21-15, 17-21, 21-13
📸: @badmintonphoto_official#Badminton #BadmintonAsia #BAC2022 pic.twitter.com/YuxwojSeIX
">Day 2 Smart Badminton Asia Championships 2022: Results Update
— Badminton Asia (@Badminton_Asia) April 27, 2022
Women's Singles
Saina Nehwal 🇮🇳 vs Sim Yujin 🇰🇷 : 21-15, 17-21, 21-13
📸: @badmintonphoto_official#Badminton #BadmintonAsia #BAC2022 pic.twitter.com/YuxwojSeIXDay 2 Smart Badminton Asia Championships 2022: Results Update
— Badminton Asia (@Badminton_Asia) April 27, 2022
Women's Singles
Saina Nehwal 🇮🇳 vs Sim Yujin 🇰🇷 : 21-15, 17-21, 21-13
📸: @badmintonphoto_official#Badminton #BadmintonAsia #BAC2022 pic.twitter.com/YuxwojSeIX
अकार्षी कश्यपलाही ( Akarshi Kashyap ) महिला एकेरीत जपानच्या अव्वल मानांकित अकाने यामागुचीकडून 15-21 9-21 ने पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत अश्विनी भट आणि शिखा गौतम ( Shikha Gautam ) आणि सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर या जोडीही सरळ गेम गमावून स्पर्धेतून बाहेर पडल्या.
अश्विनी आणि शिखा यांना अना चिंग यिक चेओंग ( Ana Ching Yik Cheong ) आणि तेओह मेई शिंग या मलेशियाच्या जोडीकडून 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. तर सिमरन आणि रितिका यांना पिएरी टेन आणि मुरलीधरन थिन्ना या सातव्या मानांकित मलेशियाच्या जोडीकडून 15-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. आज पीव्ही सिंधू, मालविका बनसोड आणि किदाम्बी श्रीकांत हे देखील एकेरीच्या सामन्यात प्रवेश करतील.
हेही वाचा - IPL 2022 Updates : आगामी आयपीएल सामन्यांसाठी संजय बांगर यांचा कोहलीला पाठिंबा