अहमदाबाद - मुंबईमध्ये उद्या (शुक्रवार) पासून अॅमॅच्युयर ऑलिम्पिया २०१९ बॉडी बिल्डर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतासह अशिया खंडातील बिल्डर सहभागी होणार आहेत. यात विजय शिंदे गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बिल्डर विजय शिंदेच्या घरची परिस्थिती बेताचीच. पण, त्याला लहानपणापासूनच बॉडी बिल्डींगची आवड होती. ती आवड त्याने जपली. त्याच्या तब्बल १४ वर्षांच्या संघर्षाचे चीज झाले असून तो अॅमॅच्युयर ऑलिम्पिया स्पर्धेत गुजरातचे प्रतिनिधित्व करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, गुजरात सरकारने अद्याप त्याला कोणतीही मदत केलेली नाही.
अॅमॅच्युयर ऑलिम्पिया स्पर्धेसाठी विजय शिंदे मागील ६ महिन्यांपासून दिवस-रात्र तयारी करत आहे. तो या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. याविषयी बोलताना विजय म्हणाला, 'मला या स्पर्धेत चांगली कामगिरीची आशा असून मी ही स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन.'
मुंबईत ही स्पर्धा १५ ते १७ नोव्हेंबर यादरम्यान रंगणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महिला आणि पुरुष बॉडी बिल्डर सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये रंगणार 'डायमंड कप इंडिया' आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा
हेही वाचा - दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल स्पर्धेचे आयोजन, पैगंबर जयंतीनिमित्त याराना ग्रूपचा उपक्रम