नवी दिल्ली - देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघ योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोट यांनी याची माहिती दिली. यातून देशातील युवांना या खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मागील 7 ऑगस्ट रोजी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
ललित भनोट म्हणाले की, 'अॅथलिट फेडरेशन ऑफ इंडियाने निर्णय घेतला आहे की, भालाफेक खेळाला चालना मिळावी, यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. यात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस ज्या दिवशी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. हा दिवस भालाफेक दिन म्हणून देशात साजरा करण्यात येईल.'
नीरज चोप्रा आणि इतर खेळाडू सन्मान सोहळ्यात माध्यमासमोर आले. यात नीरज चोप्राला, प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकावं. तु ही कामगिरी केली आहेस. आता तुझे पुढील लक्ष्य काय आहे. असे विचारले. यावर तो म्हणाला, खेळाडूने एका पदकावर समाधान मानलं नाही पाहिजे. मी पहिले राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलो आहे. आता काही दिवसात राष्ट्रकुल गेम्स यासह जागतिक स्पर्धा होणार आहे. या देखील मी जिंकू इच्छित आहे.
ऑलिम्पिक प्रदर्शन दरम्यान तुझा अखेरचा सहावा थ्रो करताना तु काय विचार केला होतास. असे विचारले असता तो म्हणाला, माझे काही थ्रो खराब ठरले होते. खरेतर भालाफेक एक टेकनिकल खेळ आहे. यात जर थोडीसी जरी चूक झाली तर गडबड होते. मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होतो. हीच बाब मी माझ्या मनात ठाणली होती. पण यादरम्यान, काही चूक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुझ्याशी बातचित केली तुला वाटत का ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी पुढे काय चांगलं असणार आहे. नीरज म्हणाला, पंतप्रधान मोदींनी माझ्याशी बातचित केली. तसे तर त्यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंशी बातचित केली. याशिवाय त्यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूला देखील बातचित केली होती. मोदी खेळाडूंचा उत्साह वाढवत होते.
दरम्यान, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारतीय खेळाडूने अॅथलेटिक्समध्ये जिंकलेले हे पहिलं पदक आहे.
हेही वाचा - हे सुवर्ण पदक माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं - नीरज चोप्रा
हेही वाचा - Etv Bharat शी बजरंग पुनियाची खास बातचित; काय म्हणाला कास्य पदक विजेता जाणून घ्या