नवी दिल्ली - लॉकडाऊनवरील निर्बंध कमी होऊ लागल्याने लोकांनी घराबाहेर जाणे सुरू केले आहे. म्हणूनच, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आदिदास इंडियाने उच्च प्रतीचे फेस मास्क लाँच केले आहेत. तीन फेस मास्कच्या पॅकची किंमत 699 रुपये आहे. परफॉरमन्स आणि ओरिजिन ब्लू अशा दोन प्रकारांमध्ये हे मास्क आदिदासने लाँच केले आहेत.
आदिदास इंडियाचे वरिष्ठ विपणन संचालक मनीष सप्रा म्हणाले, "लॉकडाऊन बंदी शिथिल होत असताना आणि लोकांसाठी बाहेर पडताना सुरक्षा वाढवणे आवश्यक आहे. हे मास्क ड्रॉपलेट ट्रांसमिशनद्वारे विषाणू आणि जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. "
-
adidas Face Mask (3 Pack)
— Sneaker Shouts™ (@SneakerShouts) June 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
available with free shipping
BUY HERE: https://t.co/5l77TRWUn3 pic.twitter.com/yapZCaatXl
">adidas Face Mask (3 Pack)
— Sneaker Shouts™ (@SneakerShouts) June 15, 2020
available with free shipping
BUY HERE: https://t.co/5l77TRWUn3 pic.twitter.com/yapZCaatXladidas Face Mask (3 Pack)
— Sneaker Shouts™ (@SneakerShouts) June 15, 2020
available with free shipping
BUY HERE: https://t.co/5l77TRWUn3 pic.twitter.com/yapZCaatXl
ते पुढे म्हणाले, "आमचा विश्वास आहे की आदिदास फेस मास्क ही एक वेगळी पद्धत आहे जी ग्राहंकांकडे चांगली छाप पाडू शकते." हे मास्क लहान आणि मोठ्या अशा दोन आकारात उपलब्ध असतील. हे मास्क देशातील 75 शहरांमध्ये उपलब्ध असतील.
मास्कची वैशिष्ठ्ये -
- प्राइमग्रीन फॅब्रिक. व्हर्जिन प्लास्टिकपासून मुक्त हे पुनर्वापरयोग्य फॅब्रिक आहे.
- 2 लेयर फॅब्रिकसह स्ट्रेचेबल इयर स्ट्रॅप.
- डिटर्जंट्सचा वापर करून धुऊन पुन्हा उपयोग केला जाऊ शकतो.
- प्रौढांसाठी आणि मुलांसाठी योग्य आहे.