थिरूवनंतपुरम - नेमबाजपटू आदर्श सिंग आणि श्रेया अग्रवाल यांनी केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी चाचणीमध्ये दुहेरी पदके जिंकली.
हरियाणाचा रहिवासी असलेल्या सिंगने पुरुष व ज्युनियर २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल टी-१ चाचणीत सुवर्णपदक पटकावले. मध्य प्रदेशच्या श्रेयानेही महिला आणि ज्युनियर महिला १० मीटर एअर रायफल टी-२ चाचणीमध्ये विजय मिळवला.
हेही वाचा - पाकिस्तानचा खेळाडू म्हणतो, 'भारताशी सामना म्हणजे...'
महिला एअर रायफल टी-२ च्या अंतिम फेरीत श्रेयाने पश्चिम बंगालच्या मेहुली घोषला मागे टाकले. तर, अपूर्वी चंडेलाने तिसरे स्थान राखले.
मध्य प्रदेशच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरनेही स्पर्धेत चांगला फॉर्म कायम राखला. त्याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स (३P) टी-२ चाचणीत विजय मिळवला. यापूर्वी आगामी २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तोमरने कोटा मिळवला आहे.