नवी दिल्ली - पुण्याच्या 47 वर्षीय विवाहित भावना टोकेकर आज महिलासाठी एक उत्तम उदाहरण बनल्या आहेत. त्या 2 दोन किशोरवयीन मुलांची आई असून त्यांनी ओपन एशियन चॅम्पियनमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात 4 सुवर्णपदके जिंकण्याचा कारनामा केला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
भावना यांनी रुसमध्ये आयोजीत ओपन एशियन पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप ऑफ AWPC/WPC स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये त्यांनी 4 सुवर्णपदाकांची कमाई केली.
मागील 6 वर्षांपूर्वी भावना यांची वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचे ठरवले. त्यांचे वय आणि जबाबदाऱ्या पाहता हे खूप कठीण होते. मात्र त्यांनी स्त्री काहीही करु शकते, हे जगाला दाखवून दिले. वयाच्या 40 वर्षी त्यांनी वेटलिफ्टिंगचा सराव करण्यास सुरुवात केली.
वेटलिफ्टिंगचे वेड पाहून भावना यांचे पती एस टोकेवर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. एस टोकेकर हे भारतीय हवाई सेनेमध्ये फायटर पायलट आहेत. त्यांनी भावना यांना सर्वोपरी मदत केली.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भावना यांनी वयाच्या 41 व्या वर्षात वेटलिंफ्टींगचा सराव करण्यास सुरूवात केली. त्यांनी हा सराव हवाई सेनेच्या मार्गदर्शनात सुरू केला. फुल्ल टाईम 'हाऊस वाईफ' असलेल्या भावना यांनी युट्यूबवर वेटलिफ्टिंगचे व्हिडिओ पाहून खेळातील बारकावे शिकल्या.
वेटलिफ्टिंग खेळासाठी मला माझ्या घरच्यांनी खूप प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहानामुळेच मी हे यश संपादन करु शकले. माझे पतीही माझ्यासोबत सराव करत असत, असे भावना सुवर्णपदक जिंकल्यानंतर म्हणाल्या.