ETV Bharat / sports

कौतुकास्पद! १९ वर्षीय गोल्फपटूने आपली कमाई दिली कोविड लसीकरण मोहिमेला

कोरोना काळात मदतीचा हात म्हणून नुकतेच कृशिवने स्पर्धांमधील जिंकलेली आपली कमाईची रक्कम चेंबूरमधील बॉम्बे प्रेसडेंसी गोल्फ क्लबला दान केली आहे.

19-year-old Indian golfer donates all his earnings to fund Vaccination Drive
कौतूकास्पद! १९ वर्षीय गोल्फपटूने आपली कमाई दिली कोविड लसीकरण मोहिमेसाठी
author img

By

Published : Apr 25, 2021, 5:03 PM IST

Updated : Apr 25, 2021, 6:52 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात सध्या उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. समाजातील सर्वस्तरातून कोरोना विरुद्ध लढाईत प्रत्येक जण आपापले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुण पिढीही यामध्ये मागे नाही, रक्तदान शिबिर असो वा अन्य उपक्रमांच्या माध्यमातून तरुण पुढे सरसावून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. यात मुंबईतील १९ वर्षीय गोल्फपटू कृशिव के. एल. तेकचंदाणी यानेही कौतुकास्पद काम केलं आहे.

गोल्फपटू कृशिव के. एल. तेकचंदाणी बोलताना....

कोरोना काळात मदतीचा हात म्हणून नुकतेच कृशिवने स्पर्धांमधील जिंकलेली आपली कमाईची रक्कम चेंबूरमधील बॉम्बे प्रेसडेंसी गोल्फ क्लबला दान केली आहे. गोल्फ फील्डवरील कर्मचाऱ्यांच्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी त्याने ही आर्थिक मदत देऊ केली आहे. कृशिवने यापूर्वीही अशीच सामाजिक बांधिलकी जपत मदत कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. वयाच्या १८ वर्षांपासून तो आपल्या वाढदिवशी रक्तदान मोहिमेत सहभाग घेऊन गरजूंना मदत करतो.

'कोणत्याही खेळात त्या फील्डवरील सपोर्ट स्टाफ कायमच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यांना आपण खेळातील फ्रंटलाईन वर्कर्स म्हणू शकतो. अशा संकटाच्या काळात खेळाडू म्हणून त्यांच्या आणि त्यांचा कुटुंबियांना आधार देणे हे माझे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया कृशिवने दिली. कृशिवच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा - मुंबई : रुग्णांच्या मदतीला धावला 'ऑक्सिजन मॅन'; ५ हजार रुग्णांना पोहोचवली मदत

हेही वाचा - मुंबई : पवनधाम कोविड सेंटर उद्यापासून सुरू होणार; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

Last Updated : Apr 25, 2021, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.