मुंबई - भारतीय नौदलातील नाविकाच्या १२ वर्षीय मुलीने पोहण्यामध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम रोगाबद्दल (एएसडी) जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिया राय हिने अरबी समुद्रात ३६ किमी पोहून हा विक्रम नोंदवला.
जिया ही भारतीय नौदलात नेव्हीगेटर असलेल्या मदन राय यांची मुलगी आहे. जियाने वांद्रे-वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर बुधवारी ८ तास ४० मिनिटांत पूर्ण केले. पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी जिया सी-लिंक येथे पोहोचली. तेथून तिने पोहायला सुरुवात केली. जिया दुपारी साडेबारा वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहोचली.
हेही वाचा - आयपीएल लिलावात 'आश्चर्यचकित' करणारे खेळाडू
त्यानंतर एक्वॅटिक असोसिएशनचे अध्यक्ष जरीर एन. बालिवाला आणि इतरांनी गेट वे ऑफ इंडियाजवळ एका कार्यक्रमात चषक देऊन जियाचा गौरव केला. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात, जियाने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेटपर्यंत १४ कि.मी.चा प्रवास केला होता.