अमृतसर - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकत इतिहास रचणारा भारतीय पुरूष हॉकी संघ भारतात काही दिवसांपूर्वी परतला आहे. परंतु अद्याप देखील विजयाची चर्चा रंगलेली आहे. कारण भारताने तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे. भारतीय हॉकी संघाच्या या यशात कर्णधार मनप्रीत सिंग याने महत्वाची भूमिका निभावली होती. मनप्रीतच्या या कामगिरीचे तिच्या आईला अभिमान आहे. घरी पोहोचल्यानंतर मनप्रीत सिंग याने एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो सर्वांची मने जिंकून घेत आहे.
मनप्रीत सिंगने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची आई ऑलिम्पिक पदक घातलेली पाहायला मिळत आहे. तर मनप्रीत आईच्या कुशीत झोपलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करता मनप्रीतने म्हटलं आहे की, तिचे हास्य पाहून आणि तिला माझा अभिमान असल्याचे जाणून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तिच्याविना आज हे होऊ शकलं नसतं.
-
Just seeing her smile and knowing how proud she is of me brings a smile to my face too - won’t be here today without her 😇 #therealwinner #loveyoumama pic.twitter.com/EwRadU7z5E
— Manpreet Singh (@manpreetpawar07) August 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Just seeing her smile and knowing how proud she is of me brings a smile to my face too - won’t be here today without her 😇 #therealwinner #loveyoumama pic.twitter.com/EwRadU7z5E
— Manpreet Singh (@manpreetpawar07) August 11, 2021Just seeing her smile and knowing how proud she is of me brings a smile to my face too - won’t be here today without her 😇 #therealwinner #loveyoumama pic.twitter.com/EwRadU7z5E
— Manpreet Singh (@manpreetpawar07) August 11, 2021
दरम्यान, मनप्रीत सिंगच्या फोटोवर नेटिझन्स भरभरून प्रतिसाद देत आहेत. मनप्रीतचा हा फोटो यूझर तुफान व्हायरल करत आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ गटात होता. या गटात भारतीय संघाने दुसरे स्थान पटकावले. पण उपांत्य फेरीत त्यांचा पराभव झाला. कास्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत इतिहास रचला.
हेही वाचा - 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा क्रमवारीत डंका, गाठलं थेट 'हे' स्थान