ETV Bharat / sports

Tokyo Olympics : चक दे इंडिया! ग्रेट ब्रिटनचा धुव्वा उडवत भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत

author img

By

Published : Aug 1, 2021, 7:08 PM IST

Updated : Aug 1, 2021, 7:47 PM IST

भारतीय पुरूष हॉकी संघाने आज उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बलाढ्य ग्रेट ब्रिटनचा 3-1 ने पराभव करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दरम्यान, भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे.

tokyo olympics hockey 2020 : India beat Great Britain by 3-1
Tokyo Olympics : चक दे इंडिया! ग्रेट ब्रिटनचा धुव्वा उडवत भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत

टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तब्बल चार दशकानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने आज उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बलाढ्य ग्रेट ब्रिटनचा 3-1 ने पराभव करत ही किमया साधली. दरम्यान, भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे.

भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या क्वार्टरमध्ये 7व्या मिनिटाला दिलप्रीत सिंहने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतीय बचावरक्षक फळीने ग्रेट ब्रिटनचे आक्रमण थोपवून ठेवले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 16व्या मिनिटाला गुरजंत सिंह याने शानदार गोल करत भारताची आघाडी 2-0 ने वाढवली. भारतीय संघ या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनवर वरचढ ठरला.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने गोल करत आघाडी कमी केली. 45व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर सॅम्युअल इयान याने हा गोल केला. तत्पूर्वी 44 व्या मिनिटाला देखील ब्रिटनला पेनाल्टी कॉर्नर मिळाला होता. यावर भारतीय खेळाडूंनी गोल करू दिला नाही. सुरेंद्र कुमार याने शानदार बचाव करत ब्रिटनचे मनसुबे उधळून लावले.

चौथ्या क्वार्टरमध्ये हार्दिक सिंह याने 57व्या मिनिटाला गोल करत भारताचा विजय निश्चित केला. दरम्यान, भारतीय संघ 1980 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

उपांत्य फेरीत भारताची गाठ बेल्जियमशी -

उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, जर्मनी, भारत आणि बेल्जियम हे चार संघ पात्र ठरले आहेत. भारताची गाठ बेल्जियम संघाशी होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध जर्मनी असा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. भारताचा सामना 3 ऑगस्ट रोजी होईल. दरम्यान, भारतीय संघाने अ गटातील ५ पैकी ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics : जय हो! भारताला आणखी एक पदक; पी. व्ही. सिंधू कांस्य पदकाची मानकरी

हेही वाचा - Greatest PV Sindhu : सिंधू 2 ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

Last Updated : Aug 1, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.