ETV Bharat / sports

भारतीय हॉकीची ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने नवी सुरुवात - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिम्पिकची आठ सुवर्णपदके जिंकली होती. 1980 च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कास्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघाने 5-4 गोलफरकाने मिळवलेला विजय हा दुर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परिश्रमांचे फळ आहे.

भारतीय हॉकी टीम
अजित पवार
author img

By

Published : Aug 5, 2021, 10:37 AM IST

Updated : Aug 5, 2021, 10:53 AM IST

मुंबई - 'भारतीय पुरुष हॉकी संघाने संघर्षपूर्ण खेळत ऑलिम्पिक कास्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. 41 वर्षांची प्रतीक्षा, प्रयत्न, परिश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकाने देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’ युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.

Indian hockey team
अजित पवार यांचे ट्वीट

दुर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परिश्रमांचे फळ -

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिम्पिकची आठ सुवर्णपदके जिंकली होती. 1980 च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघाने 5-4 गोलफरकाने मिळवलेला विजय हा दुर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परिश्रमांचे फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मने जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा

Last Updated : Aug 5, 2021, 10:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.