नवी दिल्ली - भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला एफआयएचने वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एफआयएच पुरुष हॉकी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय नोंदवला होता.
-
The Indian🇮🇳 men's hockey🏑team captain #ManpreetSingh named Player of the Year for 2019 by the International Hockey Federation. #HockeyIndia #IndiaKaGame pic.twitter.com/mMaO5CQmdj
— All India Radio News (@airnewsalerts) February 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Indian🇮🇳 men's hockey🏑team captain #ManpreetSingh named Player of the Year for 2019 by the International Hockey Federation. #HockeyIndia #IndiaKaGame pic.twitter.com/mMaO5CQmdj
— All India Radio News (@airnewsalerts) February 13, 2020The Indian🇮🇳 men's hockey🏑team captain #ManpreetSingh named Player of the Year for 2019 by the International Hockey Federation. #HockeyIndia #IndiaKaGame pic.twitter.com/mMaO5CQmdj
— All India Radio News (@airnewsalerts) February 13, 2020
हेही वाचा - १२ तास सराव आणि २ तास आराम!..तिलक वर्माचा क्रिकेटप्रवास
मनप्रीतच्या नेतृत्वात, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने रशियाला ऑलिम्पिक पात्रतांमध्ये मात देत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत मनप्रीतने जागतिक अजिंक्यपद बेल्जियमचा विक्टर वेगनेज आणि आर्थर वान डोरेन, ऑस्ट्रेलियाचा एरान जालेवस्की आणि एडी ऑकेंडेन तसेच अर्जेंटिनाचा लुकास व्हिला यांना मागे टाकले आहे.
'मला हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे आणि मला तो माझ्या संघाला समर्पित करायचा आहे. तसेच मी माझ्या हितचिंतक आणि हॉकी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. भारतीय हॉकीला खूप पाठिंबा मिळत आहे. ते पाहून आनंद झाला आहे', असे एका निवेदनात मनप्रीतने म्हटले.
हॉकी इंडियानेही या कामगिरीबद्दल मनप्रीतचे अभिनंदन केले आहे.