ETV Bharat / sports

बारा खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सत्कार - बारा खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न

यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देशातील विवीध क्षेत्रातील खेळाडूंना जाहीर झाला आहे. नीरज चोप्रा ऍथलेटिक्स, रवी कुमार कुस्ती यांच्यासह १२ खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. 13 नोव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बहुप्रतिक्षेत असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी खेल मंत्रालयाने अखेर प्रसिद्ध केली.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर
author img

By

Published : Nov 3, 2021, 4:51 PM IST

मुंबई - यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देशातील विवीध क्षेत्रातील खेळाडूंना जाहीर झाला आहे. नीरज चोप्रा ऍथलेटिक्स, रवी कुमार कुस्ती यांच्यासह १२ खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. 13 नोव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बहुप्रतिक्षेत असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी खेल मंत्रालयाने अखेर प्रसिद्ध केली.

आतापर्यंत 45 जणांना पुरस्कार

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील मेजर ध्यानचंद हे हॉकीच्या इतिहासातील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखले जातात. 1928, 1932 आणि 1936 या काळात आयोजित केलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत हॉकी खेळात भारताने तब्बल तीन सुवर्णपदके जिंकली होती. भारतात त्यांच्या नावाने दिला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा खेळातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. खेळात दैदिप्यमान आणि अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. 1991-92 पासून देण्यास सुरुवात केलेला हा पुरस्कार आतापर्यंत 45 जणांना दिला आहे. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे पुरस्कार जिंकणारे पहिले खेळाडू होते.

पुरस्काराचे नाव बदलले

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट 2021 ला राजीव गांधी यांचे नाव बदलण्याची घोषणा करत खेलरत्न पुरस्कार हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, असे जाहीर केले होते.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 विजेत्यांची नावे

नीरज चोप्रा - ऍथलेटिक्स
रवी कुमार - कुस्ती
लवलिना बोर्गोहेन - बॉक्सिंग
श्रीजेश पी. आर. - हॉकी
अवनी लेखरा - पॅरा शूटिंग
सुमित अंतील - पॅरा ऍथलेटिक्स
प्रमोद भगत - पॅरा बॅडमिंटन
कृष्णा नगर - पॅरा बॅडमिंटन
मनीष नारवाल - पॅरा शूटिंग
मिताली राज - क्रिकेट
सुनील छेत्री - फुटबॉल
मनप्रीत सिंग - हॉकी
हेही वाचा - T20 World Cup 2021 पाकिस्तानची विजयी घोडदौड कायम! नामिबियाला नमवून सेमीफायनलमध्ये धडक

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.