मुंबई - भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेटिनाच्या ब संघाने २-३ च्या फरकाने पराभूत केले. भारतीय संघाचा हा अर्जेटिना दौऱ्यातील सलग दुसरा पराभव ठरला.
भारताकडून सलिमा टेटे (सहाव्या मिनिटाला) आणि गुरजित कौर (४२ व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले तर यजमानांकडून सोल पागेला (२५ व्या मिनिटाला), काँस्टंझा सेरूनडोलो ((३८ व्या मिनिटाला) आणि ऑगस्टिना गोझ्रेलॅनी (३९ व्या मिनिटाला) यांनी गोल करत विजय मिळवून दिला.
भारताने पहिल्या हाफमध्ये चांगली सुरूवात केली. सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण या संधीचे भारतीय खेळाडूंना सोने करता आले नाही. भारतीय संघाने प्रयत्न सुरू ठेवले. तेव्हा सहाव्या मिनिटाला सलिमा टेटे हिने पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.
भारताच्या कनिष्ठ संघाचा चिलीवर विजय
भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने सहाव्या आणि अंतिम सामन्यात चिलीवर २-१ अशी मात केली. त्यामुळे चिली हॉकी दौऱ्यात भारतीय संघाने अपराजित राहण्याची किमया केली.
हेही वाचा - हॉकी : पंजाबच्या संसारपूरने भारताला १४ ऑलंपिक विजेते खेळाडू दिले
हेही वाचा - भारतीय महिला हॉकी संघाने चिलीचा उडवला धुव्वा