हिरोशिमा - भारतीय महिला हॉकी संघाने आज शनिवारी 'एफआईएच वुमेंन्स सीरीज फाईनल्स'च्या उपांत्य सामन्यात चिलीचा ४-२ ने पराभव करुन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तसेच या विजयाने भारतीय संघ एफआईएच ऑलिम्पिक २०१९ स्पर्धेच्या 'पात्रता' फेरीत दाखल झाला आहे.
भारतीय महिला संघाने चिली विरुध्दच्या सामन्यात सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. या सामन्यात भारताकडून गुरजीत कौरने २ गोल केले. तर नवनीन कौर आणि कर्णधार राणी रामपाल याने प्रत्येकी एक गोल केला. तर चिलीकडून कैरोलीना गार्सिया आणि मैनुएला याने प्रत्येकी एक गोल केला.
आता भारताचा अंतिम सामना रुस आणि यजमान जापान या दोन संघामधील विजयी झालेल्या संघासोबत होणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रविवारी दुपारी २: ३० सुरू होईल. या सामन्याचे प्रसारण 'एफआईएच डॉट लाईव्ह'वर करण्यात येणार आहे.