नवी दिल्ली - एफआयएच प्रो हॉकी लीगसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मनप्रीत सिंग भारताचे नेतृत्व करणार आहे. भारतीय हॉकीने मंगळवारी २४ सदस्यीय संघाची घोषणा केली.
हेही वाचा - VIDEO: सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर'ने सन्मान
भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियमवर खेळले जातील. मनप्रीत सिंग याला एफआयएचने वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एफआयएच पुरुष हॉकी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय नोंदवला होता.
भारतीय संघ -
श्रीजेश परतु रवेन्द्रन, कृष्ण पाठक, अमित रोहिदास, सुरेंद्र कुमार, बीरेंद्र लकडा, हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), वरुण कुमार, गुरिंदर सिंग, रूपिंदर पाल सिंग, मनप्रीत सिंग(कर्णधार), विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, चिंगलेनसाना सिंग, राज कुमार पाल, आकाशदीप सिंग, सुमित, ललित उपाध्याय, गुरसाहिबजीत सिंग, दिलप्रीत सिंग, एसवी सुनील, जनमनप्रीत सिंग, सिमरनजीत सिंग, नीलकांत शर्मा, रमनदीप सिंग.