ढाका - आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पुन्हा एकदा रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. यादरम्यान भारताने 4 गोल केले, तर पाकिस्तानला केवळ 3 गोल करता आले. गतविजेत्या आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने बुधवारी येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुष हॉकी स्पर्धेत दमदार कामगिरी केली.
या विजयासह त्यांनी कांस्यपदक निश्चित केले. हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, गुरसाहिबजीत सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केल्याने भारताने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर रोमहर्षक विजय नोंदवला.
याआधी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाने रोमहर्षक लढतीत पाकिस्तानचा ६-५ असा पराभव केला होता तर भारताला जपानकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला होता.
हेही वाचा - ईटीव्ही भारत महाराष्ट्राने पब्लिश केली होती न्यूज, आनंद महिंद्रांनी घेतली दखल, ऑफर केली बोलेरो