नवी दिल्ली - हॉकी इंडियाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालची शिफारस केली आहे. राणीव्यतिरिक्त वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंग यांना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
राणीच्या नेतृत्वात संघाने महिला आशिया चषक 2017 आणि 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. शिवाय, तिच्या नेतृत्वात संघाने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली आहे. यावेळी भारताने जागतिक क्रमवारीतही सर्वोत्तम नववे स्थान मिळवले.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक म्हणाले, "सरदारसिंग राजीव गांधी खेलरत्न जिंकणारा शेवटचा हॉकी खेळाडू होता. राणीने महिला हॉकीमध्ये नवीन ध्येय गाठले असून तिचा आम्हाला अभिमान आहे."
तर, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (बीएफआय) प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अमित पांघल आणि विकास कृष्णन यांची शिफारस केली आहे.