नवी दिल्ली - माजी आंतरराष्ट्रीय हॉकी अंपायर अनुपमा पंचिमांदा यांचे कोरोनामुळे निधन झाले. रविवारी त्यांनी बंगळुरूमध्ये अखेरच्या श्वास घेतला.
अनुपना यांच्या निधनावर हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबाम यांनी शोक व्यक्त केलं. ते शोक संदेशात म्हणाले की, 'आज आम्हाला अनुपमा यांच्या निधनाची बातमी कळाली. त्या भारताच्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंपायरिंग केलं. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.'
राष्ट्रीय स्तरावरिल खेळाडू अनुपमा यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात २००५ बीडीओ ज्यूनियर महिला विश्व करंडक, २०१३ मध्ये दिल्ली येथे आयोजित हिरो हॉकी महिला विश्व लीग राऊंड-२ आणि २०१३ महिला अशिया कप स्पर्धेचा समावेश आहे.
हेही वाचा - भारताचे माजी हॉकीपटू बलबीर सिंग (धाकटे) यांचे निधन
हेही वाचा - भारतातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची राउरकेला येथे पायाभरणी