ETV Bharat / sports

सुवर्णपदक विजेते हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचे कोरोनाने निधन - Moscow Olympic gold medallist Ravinder Pal Singh succumbs to COVID-19

भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू रविंदर पाल सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले.

former hockey player ravinder pal singh succumbs-to-covid-19
सुवर्णपदक विजेते हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचे कोरोनाने निधन
author img

By

Published : May 8, 2021, 3:30 PM IST

नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू रविंदर पाल सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले. सिंह यांच्या निधनावर केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी शोक व्यक्त केलं आहे.

रविंदर पाल सिंह यांनी वयाच्या ६५व्या वर्षी लखनौ येथील रुग्णालयात उपचारादरम्यान, अखेरचा श्वास घेतला. १९८० साली झालेल्या मास्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकले होते. या विजेत्या संघाचे सिंह हे सदस्य होते.

रिजिजू यांनी सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. या संदर्भात रिजिजू यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'रविंदर पाल यांच कोरोनाने निधन झालं, ही बातमी मला जेव्हा मला कळाली. तेव्हा खूप दु:ख झालं. त्यांच्या निधनासह भारताने एक गोल्डन सदस्य गमावला. ते १९८० मास्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य होते. भारतीय क्रीडा जगतामध्ये त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहिल.'

  • I'm deeply saddened to learn that Shri Ravinder Pal Singh ji has lost the battle to Covid19. With his passing away India loses a golden member of the hockey team that won Gold in the 1980 Moscow Olympics. His contribution to Indian sports will always be remembered. Om Shanti🙏 pic.twitter.com/rCE1pcaIgx

    — Kiren Rijiju (@KirenRijiju) May 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मास्को आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिक शिवाय सिंह यांनी कराचीमध्ये चॅम्पियन ट्रॉफी (१९८०, १९८३), सिल्वर जुबली १० नेशन कप (हाँगकाँग १९८३), विश्व कप (मुंबई १९८२), अशिया कपसहित अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या होत्या.

हेही वाचा - माजी आंतरराष्ट्रीय हॉकी अंपायर अनुपमा पंचिमांदा यांचे कोरोनामुळे निधन

हेही वाचा - भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक एम के कौशिक यांना कोरोनाची लागण

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.