भुवनेश्वर - भारताच्या पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. भारताने शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात जगजेत्या बेल्जियमला २-१ ने पराभवाचा धक्का दिला.
भुवनेश्वर येथील कलिंगा हॉकी स्टेडियमवर भारत-बेल्जियम सामना पार पडला. या सामन्यात ११ गुणांसह पहिल्या स्थानावर असलेल्या बेल्जियमला भारताने पराभवाचा धक्का दिला.
भारतीय खेळाडूंनी पहिल्या सत्रापासूनच आक्रमक खेळ केला आणि भारतीय आघाडीपटूंनी बेल्जियमच्या बचावपटूंवर दबाव आणला. भारताची ही रणणिती यशस्वी ठरली. मनदीपसिंगने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. भारताने ही आघाडी मध्यांतरापर्यंत कायम राखली.
भारतीय गोलरक्षक श्रीजेशने बेल्जियमच्या आघाडीच्या खेळाडूंच्या चाली हाणून पाडल्या. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला गौतियर बोकार्डने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून बेल्जियमला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तेव्हा रमनदीप सिंगने ४७ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताला २-१ ने आघीवर आणले. अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखत सामना जिंकला.
हेही वाचा - न्यूझीलंड दौरा : अखेरच्या सामन्यात भारताने उडवला यजमानाचा धुव्वा
हेही वाचा - राणीने जिंकला 'वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर'चा पुरस्कार