माद्रिद - यंदाच्या ला-लीगा हंगामातील उर्वरित 11 सामन्यांमध्ये प्रेक्षकांना व्हर्च्युअल स्टेडियममध्ये बसलेले दाखवले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर सामन्यांमध्ये चाहत्यांचा आवाजही ऐकू येणार आहे. खबरदारी म्हणून सर्व सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील.
"हा तंत्रज्ञानाचा वापर रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती दर्शवेल. व्हर्च्युअल चाहते यजमान संघाचा रंग परिधान करताना दिसतील. सामना थांबला की स्टेडियममध्ये व्हर्च्युअल प्रेक्षकांची जागा यजमान संघाचा रंग घेईल. यावेळी विवध संदेशही दाखवले जातील", असे लीगने सांगितले.
लीगने पुढे सांगितले, "या प्रकारे सामने प्रसारित केल्यास प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची कमतरता जाणवणार नाही." ला लीगाच्या पहिल्या दोन फेऱ्यांच्या सामन्यांची घोषणा झाली आहे. 11 जूनला सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सेविला आणि रिअल बेटिस आमनेसामने असतील. तर, 13 जूनला बार्सिलोनाचा संघ रियल मॅलोर्काविरुद्ध उभा ठाकेल. कोरोनामुळे ही लीग मार्चमध्ये तहकूब करण्यात आली होती.