मुंबई - कोरोना विषाणूमुळे स्पॅनिश फुटबॉल अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचा वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू झाला. आज (मंगळवार) मलागाच्या अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबने याची माहिती इन्स्टाग्रामवरुन दिली. गार्सियाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गार्सियाच्या निधनावर अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबचे अध्यक्ष पेपे ब्युएनो यांनी सांगितलं, की 'मला रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की गार्सियाची प्रकृती सुधारत आहे, पण तासाभरात त्याच्या जाण्याची बातमी समजली. आमच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. गार्सिया हा प्रतिभावान प्रशिक्षक होता.'
-
REST IN PEACE 🥀 #Franciscogarcia https://t.co/6yWbO7k4e5
— 𝕁𝕒𝕜 𝔸𝕤𝕟_𝕝 ™ (@jakarsenal) March 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">REST IN PEACE 🥀 #Franciscogarcia https://t.co/6yWbO7k4e5
— 𝕁𝕒𝕜 𝔸𝕤𝕟_𝕝 ™ (@jakarsenal) March 17, 2020REST IN PEACE 🥀 #Franciscogarcia https://t.co/6yWbO7k4e5
— 𝕁𝕒𝕜 𝔸𝕤𝕟_𝕝 ™ (@jakarsenal) March 17, 2020
अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन गार्सियाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, स्पेनमध्ये मंगळवारी सकाळपर्यंत ९ हजार ९४२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे स्पेनमध्ये आतापर्यंत ३४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूमुळे स्पेनमधील सर्व फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत. गार्सियाच्या मृत्यूपूर्वी कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये लंडनमधील ५९ वर्षीय निक मॅथ्यूज यांचा समावेश होता.
हेही वाचा - Fact Check : रोनाल्डो खरचं कोरोना रुग्णांसाठी आपल्या हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये करणार का?
हेही वाचा - इटलीच्या ११ फूटबॉलपटूंना कोरोनाची लागण