ETV Bharat / sports

बिकट परिस्थितीला 'किक'..! नगरची शुभांगी करणार होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

शुभांगीची खेळातील मेहनत, जिद्द-चिकाटी अखेर कामाला आली आणि आता ती थेट खेळणार आहे इंग्लड येथे होणाऱ्या होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये

शुभांगी राजू भंडारे
author img

By

Published : May 30, 2019, 6:16 PM IST

अहमदनगर - आपल्यातील अंगभूत गुणांना योग्य वेळी वाव मिळाला तर बिकट परिस्थितीतही ती व्यक्ती स्वतःला सिद्ध करू शकते आणि 'हम भी कुछ कम नही' म्हणत तथाकथित 'सो-कॉल्ड' समजल्या जाणाऱ्या समाजाला विचार करायला भाग पाडते. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अहमदनगरच्या संजयनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या शुभांगी राजू भंडारे हिच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेतील निवडीने हेच सिद्ध केले आहे.

नगरची शुभांगी करणार होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

शुभांगीचे वडील एसटी बस स्थानकात एसटीच्या मागे धावत वडापाव विकणारे, आई एका हॉटेलमध्ये स्वयंपाकीन म्हणून काम करणारी. घर झोपडपट्टीत पत्र्यांच्या शेडचे आणि घरात ३ बहिणी आणि एक भाऊ. अर्थात घरात अठराविश्वे दारिद्र्य, मात्र तिने जिद्द बाळगली की मी फुटबॉल शिकणार आणि देशाच्या संघात स्थानही मिळणार. तिची खेळातील मेहनत, जिद्द-चिकाटी अखेर कामाला आली आणि आता ती थेट खेळणार आहे. इंग्लड येथील कार्डिफ आणि वेल्समधील अत्याधुनिक फुटबॉल स्टेडियममध्ये.

होय, ही कहाणी आहे अहमदनगर शहरातल्या संजयनगर झोपडपट्टीत वाढलेल्या शुभांगी राजू भंडारे हिची. शुभांगीला बालपणापासूनच फुटबॉल खेळण्याची आवड. तिच्यातील फुटबॉलचे नैपुण्य स्नेहालय बालभवन सामाजिक संस्थेच्या सत्यमेव जयते फुटबॉल अकॅडमीने ओळखले आणि तिला संधी दिली. शुभांगीनेही या संधीचे सोने केले आणि तिची निवड आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या 'होमलेस वर्ल्ड कप-२०१९' स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघात झाली आहे.

शुभांगीचे आई-वडील अशिक्षित आहेत. मात्र प्रामाणिकपणे आणि कष्टाणे त्यांनी आपल्या मुलांना स्नेहालयाच्या बालभवनच्या माध्यमातून शिक्षित केले. आणि शुभांगीतील फुटबॉलची आवड पाहून प्रोत्साहितही केले. शुभांगीचे जागतिक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या निवडीच्या यशात स्नेहालय, बालभवन आणि सत्यमेव जयते अकॅडमीचा मोठा वाटा आहे. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या वाटा उपलब्ध करून देतानाच झोपडपट्टीत लपलेल्या 'शुभांगी' सारख्या मुलांमधील कला-गुणांना शोधण्याचे आणि त्यांना प्रशिक्षित करून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ईश्वरीय काम स्नेहालय करते.

बिकट आर्थिक परस्थितीवर मात करत शुभांगीने या स्पर्धेत निवड व्हावी यासाठी अपार मेहनत घेतली आहे. जुलै महिन्यात तिचे नागपूर आणि थायलंड इथे सांघिक कॅम्प आहेत. आणि त्यानंतर 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड येथे स्पर्धा पार पडणार आहे. मात्र या मध्ये इतर खर्चही असल्याने तो कसा उभा करायचा याची चिंता शुभांगीच्या आईवडिलांना सध्या आहे. त्यामुळे आई-वडिलांनी तसेच स्नेहालय परिवाराने शुभांगीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मात्र जिद्दीने स्वतःला सिद्ध करून बिकट परिस्थितीवर मात करत जागतिक फुटबॉल स्पर्धेत धडक मारणारी शुभांगी सर्व अडचणींना किक मारून यशस्वी होईल यात शंका नाही.

Intro:अहमदनगर- बिकट परिस्थितीला 'किक' मारून तीने मिळवले जागतिक फुटबॉल संघात स्थान.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_slum_footboll_girl_2019_vij1_7204297

अहमदनगर- बिकट परिस्थितीला 'किक' मारून तीने मिळवले जागतिक फुटबॉल संघात स्थान..

अहमदनगर- आपल्यातील अंगभूत गुणाला योग्यवेळी वाव मिळाला तर बिकट परीस्थितीतही ती व्यक्ती स्वतःला सिद्ध करू शकते आणि हम भी कुछ कम नही म्हणत तथाकथित 'सो-कॉल्ड' समजणाऱ्या समाजाला विचार करायला भाग पाडते. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अहमदनगर च्या संजय नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या शुभांगी राजू पवार हिच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेतील निवडीने हेच सिद्ध केलंय..

- वडील एसटी स्टँडवर एसटीच्या मागे धावत वडापाव विकणारे, आई एका हॉटेल मध्ये स्वयंपाकिन म्हणून काम करणारी.. घर झोपडपट्टीत पत्रांच्या शेडच.. घरात तीन बहिणी आणि एक भाऊ.. अर्थात घरात आठराविश्व दारिद्र्य, मात्र तिने जिद्द बाळगली की मी फुटबॉल शिकणार आणि देशाच्या संघात स्थानही मिळणार.. तिची खेळातील मेहनत, जिद्द-चिकाटी अखेर कामाला आली आणि आता ती थेट खेळणार आहे इंग्लड मधील कार्डील आणि वेल्स मधील अत्याधुनिक फुटबॉल स्टेडियम मधे.. होय, ही कहाणी आहे अहमदनगर शहरातल्या संजयनगर झोपडपट्टीत वाढलेल्या शुभांगी राजू भंडारे हिची.. शुभांगीला बालपणापासूनच फुटबॉल खेळण्याची आवड.. तिच्यातील फुटबॉलचे नैपुण्य स्नेहालय बालभवन सामाजिक संस्थेच्या सत्यमेव जयते फुटबॉल अकॅडमीने ओळखले आणि तिला संधी दिली. शुभांगीनेही ह्या संधीचे सोने केलेय.. तिची निवड आता इंग्लंड मधे होणाऱ्या होमलेस जागतिक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली आहे..
- शुभांगीचे आई-वडील अशिक्षित आहेत. मात्र प्रामाणिकपणे आणि कष्टाणे त्यांनी आपल्या मुलांना स्नेहालायच्या बालभवनच्या माध्यमातून शिक्षित केले. आणि शुभांगीतील फुटबॉलची आवड पाहून प्रोत्साहितपण केलेय..
- शुभांगीच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या निवडीच्या यशात स्नेहालय, बालभवन आणि सत्यमेव जयते अकॅडमीचा मोठा वाटा आहे. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या वाटा उपलब्ध करून देतानाच झोपडपट्टीत लपलेल्या 'शुभांगी' सारख्या कला-गुणांना शोधण्याचे आणि त्यांना प्रशिक्षित करून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ईश्वरीय काम स्नेहालय करतय..
- बिकट आर्थिक परस्थितीवर मात करत शुभांगीने या स्पर्धेत निवड व्हावी यासाठी अपार मेहनत घेतली आहे. जुलै महिन्यात तिचे नागपूर आणि थायलंड इथे सांघिक कॅम्प आहेत. आणि त्यानंतर 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड मधे स्पर्धा पार पडणार आहे. मात्र या मधे इतर खर्चही असल्याने तो कसा उभा करावयाचा याची चिंता शुभांगीच्या आईवडिलांना सध्या आहे. त्यामुळे आई-वडिलांनी तसेच स्नेहालय परिवाराने शुभांगी साठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मात्र जिद्दीने स्वतःला सिद्ध करून आहे त्या परिस्थितीवर मात करत जागतिक फुटबॉल स्पर्धेसाठी धडक मारणारी शुभांगी सर्व अडचणींना किक मारून यशस्वी होईल यात शंका नाही..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- बिकट परिस्थितीला 'किक' मारून तीने मिळवले जागतिक फुटबॉल संघात स्थान..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.