मुंबई - भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला स्पेनच्या 'ला लीग फुटबॉल स्पर्धे'चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. गुरुवारी मुंबईत 'ला लीगा'च्या वतीने ही घोषणा करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या स्पर्धेच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळाडूची ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे.
-
Here he is...🤩
— LaLiga (@LaLigaEN) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The new #LaLiga Brand Ambassador in India, Rohit Sharma! 🇮🇳🏏⚽✨
Welcome, @ImRo45! 🤝🙌 pic.twitter.com/ecMsRb9rzS
">Here he is...🤩
— LaLiga (@LaLigaEN) December 12, 2019
The new #LaLiga Brand Ambassador in India, Rohit Sharma! 🇮🇳🏏⚽✨
Welcome, @ImRo45! 🤝🙌 pic.twitter.com/ecMsRb9rzSHere he is...🤩
— LaLiga (@LaLigaEN) December 12, 2019
The new #LaLiga Brand Ambassador in India, Rohit Sharma! 🇮🇳🏏⚽✨
Welcome, @ImRo45! 🤝🙌 pic.twitter.com/ecMsRb9rzS
या विषयी बोलताना रोहितने सांगितले की, 'ला लीगाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड होणे माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. भारत सध्या इतर खेळांमध्ये तसेच फुटबॉलमध्ये प्रगती करत आहे. कारण आयएसएल आणि राष्ट्रीय संघाचे सामने बघताना ही गोष्ट दिसून येते. आयएसएलमुळे युवा खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे.'
-
Hola India/España, as you guys know, football has always held a special place in my heart so this association is so special to me. And to be named the ambassador for the La Liga is so humbling. So excited for this partnership @LaLigaEN pic.twitter.com/prZFFSeHdV
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hola India/España, as you guys know, football has always held a special place in my heart so this association is so special to me. And to be named the ambassador for the La Liga is so humbling. So excited for this partnership @LaLigaEN pic.twitter.com/prZFFSeHdV
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2019Hola India/España, as you guys know, football has always held a special place in my heart so this association is so special to me. And to be named the ambassador for the La Liga is so humbling. So excited for this partnership @LaLigaEN pic.twitter.com/prZFFSeHdV
— Rohit Sharma (@ImRo45) December 12, 2019
आयपीएलप्रमाणेच आयएसएलमध्ये छाप पाडून युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे येत आहेत. याचा फायदा नक्कीच होणार आहे. या शिवाय भारतात फुटबॉलचा प्रसारही चांगल्याप्रकारे होत आहे, यामध्ये आणखी वाढ होईल, असेही रोहितने सांगितलं. यावेळी रोहितने मिळालेल्या सन्मानाबद्दल भारावून गेल्याचे सांगताना ला लीगाचे आभारही मानले.
हेही वाचा - बंदी असूनही रशिया खेळू शकतो फिफा विश्वकरंडक स्पर्धेचा पात्रता सामना
हेही वाचा - फुटबॉलच्या जादूगाराच्या जर्सीचा झाला लिलाव, किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!