ETV Bharat / sports

रॉबर्ट लेवांडोव्स्की ठरला वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू - uefa men's player of the year

बायर्न म्युनिकचा खेळाडू रॉबर्ट लेवांडोव्स्कीने या मोसमात ४७ सामन्यांत ५५ गोल केले आहेत. या हंगामात त्याने केवळ पाच सामने खेळले.

robert lewandowski named uefa men's player of the year for 2019-2020
रॉबर्ट लेवांडोव्स्की ठरला वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू
author img

By

Published : Oct 2, 2020, 5:25 PM IST

नवी दिल्ली - जर्मन फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकचा खेळाडू रॉबर्ट लेवांडोव्स्कीला युईएफएचा २०१९-२०या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. "ही एक चांगली भावना आहे. मला संघातील सहकाऱ्यांचे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने मी खेळलो त्यांचे आभार मानायचे आहेत. तसेच, मी माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो", असे लेवांडोव्स्कीने या निवडीनंतर सांगितले.

लेवांडोव्स्कीने या मोसमात ४७ सामन्यांत ५५ गोल केले आहेत. या हंगामात त्याने केवळ पाच सामने खेळले. जर्मन लीगमध्ये ३४ गोलांसह तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १५ आणि डीएफबी चषकात ६ गोल केले. लेवांडोव्स्कीने १० गोल करण्यात ही सहकार्य केले आहे.

लेवांडोव्स्कीच्या संघाचा गोलकीपर मॅन्युअल न्यूअरला वर्षाचा सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. जोशुआ किमिचला सर्वोत्तम बचावपटू तर डी ब्रुयनेला सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर म्हणून घोषित करण्यात आले. बायर्नचे प्रशिक्षक हॅन्स डायटर फ्लिक यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

महिला गटात पर्निल हार्डरला वर्षाची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवडले गेले आहे. कोरोनामुळे २०१९-२०चा हंगाम उशीरा संपला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.