ETV Bharat / sports

फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने बार्सिलोना सोडल्यानंतर 'या' क्लबशी केला करार - लिओनेल मेस्सी

रिपोर्टनुसार, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मन क्लबशी करार केला आहे. परंतु अद्याप याचे डिटेल्स समोर आलेले नाहीत.

Reports: Messi agrees deal to join Paris Saint-Germain
फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने बार्सिलोना सोडल्यानंतर 'या' क्लबशी केला करार
author img

By

Published : Aug 10, 2021, 5:33 PM IST

Updated : Aug 10, 2021, 6:16 PM IST

पॅरिस - स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लब सोडल्यानंतर फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मन क्लबसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. लवकरच तो दुसऱ्या क्लबकडून खेळताना पाहायला मिळेल. लिओनेल मेस्सीने 21 वर्षांनंतर स्पॅनिश क्लब बार्सिलोनाची साथ सोडली होती. तो प्रेस कॉन्फरन्समध्ये भावूक झाला होता.

लिओनेल मेस्सीला पॅरिस सेंट जर्मन क्लबकडून खेळताना दरवर्षी 25 मिलियन पाउंड म्हणजे जवळपास 258 कोटी रुपये मिळतील. 34 वर्षीय मेस्सीला 3 वर्षे हा करार वाढवता येऊ शकतो. मेस्सी बार्सिलोनासोबत 5 वर्षांच्या करारासाठी तयार होता. परंतु क्लबने हा करार नाकारला.

मागील आठवड्यात बार्सिलोना क्लब सोडल्यानंतर मेस्सीकडे दोन पर्याय होते. त्याने पीएसजीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मेस्सीने मागे म्हटलं होतं की, मी बार्सिलोनासोबत राहु इच्छित आहे. यासाठी मी सर्व प्रयत्न केले. यात मी माझं मानधन 50 टक्क्याने कमी करण्यास तयार झालो होतो.

दरम्यान, आता मेस्सी पॅरिस सेंट जर्मन क्लबशी जोडला गेला आहे. या क्लबकडून त्याचा बार्सिलोनाचा जुना सहकारी ब्राझीलियन नेमार देखील खेळतो. यामुळे आगामी काळात मेस्सी आणि नेमार यांची जोडी पुन्हा एकाच क्लबकडून खेळताना पाहायला मिळतील.

हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार

हेही वाचा - Eng vs Ind: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात मोईन अलीची वापसी

Last Updated : Aug 10, 2021, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.