माद्रिद - ला लीगामध्ये रिअल माद्रिद आणि गिरोना यांच्यातील सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. क्रमवारीत १६ व्या क्रमांकावरील संघ गिरोनाने तिसऱ्या क्रमांकावरील रिअल माद्रिदला २-१ असा पराभवाचा धक्का दिला.
FP: @realmadrid 1-2 @GironaFC
— Real Madrid C.F.⚽ (@realmadrid) February 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⚽ @Casemiro 25'; Stuani 65' (p), Portu 75'#RMLiga pic.twitter.com/pta596lvkJ
">FP: @realmadrid 1-2 @GironaFC
— Real Madrid C.F.⚽ (@realmadrid) February 17, 2019
⚽ @Casemiro 25'; Stuani 65' (p), Portu 75'#RMLiga pic.twitter.com/pta596lvkJFP: @realmadrid 1-2 @GironaFC
— Real Madrid C.F.⚽ (@realmadrid) February 17, 2019
⚽ @Casemiro 25'; Stuani 65' (p), Portu 75'#RMLiga pic.twitter.com/pta596lvkJ
कॅसिमिरोन पहिल्या सत्रात २४ व्या मिनिटाला गोल करत रिअलला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या सत्रात गिरोनाने आक्रमक खेळ केला. ६५ व्या मिनिटाला ख्रिस्टियन स्टुआनीने गोल करत गिरोनाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. रिअलचा कर्णधार सर्गियो रॅमोसच्या हॅन्डबॉलनंतर गिरोनाला पेनल्टी मिळाली. याचा, फायदा घेताना गिरोनाने बरोबरी साधली. सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला पोर्टूने गोल करत गिरोनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
रिअलने गोल करण्यासाठी मारिआनो डियाझ, गॅरेथ बेल, करिम बेंझेमा आणि व्हिनिशिअस ज्यूनियर मैदानावर होते. परंतु, कोणालाही गोल करता आला नाही. कर्णधार सर्गियो रॅमोसला ९० व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड मिळाले. यामुळे, त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
रिअल माद्रिदने मागील ५ सामन्यात विजय मिळवला होता. चांगल्या फॉर्मात असलेल्या रिअलला गिरोनाकडून अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. तर, सलग १० पराभव झाल्यानंतर गिरोनाला हा विजय मिळाला आहे. विजयासह गिरोना गुणतालिकेत १५ व्या क्रमांकावर आला आहे.