ETV Bharat / sports

हजारो चाहत्यांनी लाडक्या मॅराडोनाला वाहिली श्रद्धांजली - दिएगो मॅराडोना लेटेस्ट न्यूज

अर्जेंटिनाच्या राष्ट्रध्वजात मॅराडोना यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर त्याची १० नंबरची जर्सी देखील ठेवण्यात आली होती. चाहते विविध संघाच्या जर्सी घालून आले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.१५ वाजता मोजक्या व्यक्ती आणि कुटुंबींयाच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

President of argentina and thousands of fans paid tribute to diego maradona
लाडक्या मॅराडोनाला हजारो चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली
author img

By

Published : Nov 27, 2020, 10:54 AM IST

अर्जेटिना - अर्जेटिनाचे अध्यक्ष अल्बट्रे फर्नाडेझ यांनी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कार होण्यापूर्वी, मॅराडोना यांचे पार्थिव कासा रोसाडा येथील अध्यक्षीय मुख्यालयात ठेवण्यात आले होते. हजारो चाहत्यांनी मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली.

अर्जेंटिनाच्या राष्ट्रध्वजात मॅराडोना यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर त्याची १० नंबरची जर्सी देखील ठेवण्यात आली होती. चाहते विविध संघाच्या जर्सी घालून आले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.१५ वाजता मोजक्या व्यक्ती आणि कुटुंबींयाच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मॅराडोना यांच्या डोक्यावर ब्लॉट-क्लॉट शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर ३ आठवड्यांनंतर मॅराडोना यांचे निधन झाले, अशी माहिती मॅराडोना यांच्या वकिलांनी दिली. फुटबॉलविश्वात मॅराडोना यांचे नाव आदराने घेतले जाते. जगद्विख्यात फुटबॉलपटू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने खेळजगतासह संपूर्ण जगभरात शोक व्यक्त केला जात आहे.

कोरोना चाचणी निगेटिव्ह -

मॅराडोना मध्यंतरी ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेले होते. १९९१साली ड्रग्ज नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर १५ महिन्यांची बंदी घातली गेली होती. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना चाचणीदेखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. १९८६मध्ये त्यांनी अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.