नवी दिल्ली - जुव्हेंटस या प्रसिद्ध क्लबच्या दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता आणखी एक फुटबॉलपटू कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू पाउलो डायबाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे श्रीलंकेतील स्थानिक क्रिकेट सामने स्थगित
तत्पूर्वी, इटलीचा फुटबॉल क्लब असलेल्या जुव्हेंटसचा खेळाडू ब्लेझ माटुडीची कोरोन व्हायरस चाचणी 'पॉझिटिव्ह' आली होती. ब्लेझ माटुडी हा कोरोना व्हायरसची लागण झालेला जुव्हेंटसचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याअगोदर, रुगानी कोरोना असल्याची पुष्टी झाली होती. आता पाउलो डायबाला हा कोरोना पॉझिटिव्ह असलेला जुव्हेंटसचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
स्पेनच्या क्लब वॅलेन्सिया सीएफने ३५ टक्के खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची चाचणी 'पॉझिटिव्ह' आली असल्याचे म्हटले होते. कोरोना व्हायरसचा फुटबॉल विश्वावर मोठा परिणाम झाला असून अनेक स्पर्धा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.