असुनसियन - बनावट पासपोर्टमुळे अटक करण्यात आलेला ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो आणि त्याचा भाऊ रोबटेरे एसीस यांना तुरूंगातून सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायाधीशांनी या दोघांची नजरकैदेत ठेवण्याची विनंती मान्य केली आहे. ३९ वर्षीय रोनाल्डिन्हो आणि त्याचा भाऊ बनावट पासपोर्टसह पॅराग्वेमध्ये दाखल झाले होते.
एका वृत्तानुसार, कोर्टाने यापूर्वी त्याच्या भावाचा तीन वेळा जामीन अर्ज फेटाळला होता. परंतु यावेळी कोर्टाने त्यांना सुमारे १६ लाख अमेरिकन डॉलर्सच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाने जामीन मंजूर करताना या प्रकरणातील चौकशी होईपर्यंत दोन्ही भावांना पालमरोगा हॉटेलमध्येच राहण्याचे आदेश दिले.
४ मार्च रोजी दोन्ही भाऊ पराग्वे येथे पोहोचले. ते येथे मुलांच्या चॅरिटी मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यानंतर, रोनाल्डिन्हो त्याच्या कारकीर्दीवर आधारित पुस्तकाची जाहिरात करणार होता.