ETV Bharat / sports

बेल्जियमचे माजी प्रशिक्षक मार्क विल्मोट्स आता इराणच्या संघाला देणार फुटबॉलचे धडे

विल्मोट्स यांनी बेल्जियमसाठी ४ विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला आहे

मार्क विल्मोट्स
author img

By

Published : May 15, 2019, 9:34 PM IST

तेहरान - बेल्जियमचे माजी प्रशिक्षक मार्क विल्मोट्स यांची इराण फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विल्मोट्स यांनी बुधवारी इराणच्या राष्ट्रीय संघासोबत २०२२ पर्यंतचा करार केला आहे.

मिडफील्डर म्हणून खेळताना विल्मोट्स यांनी आजवर अनेक क्लब्सचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी बेल्जियमसाठी ४ विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. विल्मोट्स हे २०१७ ते आतापर्यंत आयव्हरी कोस्ट फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपदी काम पाहत होते.

इराणचे माजी प्रशिक्षक कार्लोस क्वीरोज यांनी AFC Asian Cup 2019 स्पर्धेत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर आता विल्मोट्स संघाची कमान हातात घेणार आहेत.

Intro:Body:

spo 06

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.