माद्रिद - स्पॅनिश लीग ला-लीगा क्लब रियल मालोर्काला रिअल माद्रिदकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही संघाचा युवा खेळाडू लुका रोमेरोने इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवले. लुका हा या लीगमध्ये खेळणारा सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला.
मेक्सिकोच्या मूळ रोमेरोने 83व्या मिनिटाला पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरतत हा विक्रम नोंदवला. त्याने लीगमधील 80 वर्षांचा रेकॉर्डही मोडला. 15 वर्षांचा आणि 229-दिवसांचा लुका लीगमध्ये खेळणारा सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला.
-
Luka Romero made his La Liga debut at just 15 years and 219 days old 👶
— Goal (@goal) June 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
No wonder they call him 'The Mexican Messi' 🔥🔥🔥 pic.twitter.com/Jq5xcxjrIo
">Luka Romero made his La Liga debut at just 15 years and 219 days old 👶
— Goal (@goal) June 25, 2020
No wonder they call him 'The Mexican Messi' 🔥🔥🔥 pic.twitter.com/Jq5xcxjrIoLuka Romero made his La Liga debut at just 15 years and 219 days old 👶
— Goal (@goal) June 25, 2020
No wonder they call him 'The Mexican Messi' 🔥🔥🔥 pic.twitter.com/Jq5xcxjrIo
यापूर्वी, ला लीगामध्ये सर्वात युवा खेळाडू म्हणून खेळण्याचा विक्रम सेल्टा विगोच्या फ्रान्सिस्को बाओ रॉडिगुएझ यांच्या नावावर होता. त्यांनी 1939-40 मध्ये 15 वर्ष आणि 255 दिवसांचा असताना पदार्पण केले होते.
"हा एक न विसरता येणारा क्षण होता. सर्व तांत्रिक कर्मचारी आणि मालोर्का यांचे आभार ज्यांनी मला ही संधी दिली. मी हा दिवस कधीही विसरणार नाही", असे लुका सामन्यानंतर म्हणाला.