ETV Bharat / sports

मेस्सीने नोंदवला कारकिर्दीतील 700 वा गोल! - 700th goal messi news

बार्सिलोनाकडून खेळताना मेस्सीचा हा 630 वा गोल होता. मेस्सीने 1 मे 2005 रोजी बार्सिलोनासाठी पहिला गोल केला होता. 2012 मध्ये मेस्सीने 91 गोल ​​केले होते. या गोलसह त्याने ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा वर्षातील 75 गोलचा विक्रम मोडित काढला.

Football club barcelona played a draw with atletico in the spanish league
मेस्सीने नोंदवला कारकिर्दीतील 700 वा गोल!
author img

By

Published : Jul 1, 2020, 2:11 PM IST

बार्सिलोना - फुटबॉल क्लब बार्सिलोनाने स्पॅनिश लीगमध्ये अ‍ॅटलेटिकोविरूद्ध झालेल्या सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली. यावेळी बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कारकिर्दीतील 700 वा गोल नोंदवला. मंगळवारी कॅम्प नाऊ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मेस्सीने ही कामगिरी केली.

  • Match Report

    — FC Barcelona (@FCBarcelona) June 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बार्सिलोनाकडून खेळताना मेस्सीचा हा 630 वा गोल होता. मेस्सीने 1 मे 2005 रोजी बार्सिलोनासाठी पहिला गोल केला होता. 2012 मध्ये मेस्सीने 91 गोल ​​केले होते. या गोलसह त्याने ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा वर्षातील 75 गोलचा विक्रम मोडित काढला.

"मेस्सी खूप महत्वाकांक्षी आहे. त्याच्या पुढेही अनेक गोल आहेत. संघासाठी सर्वाधिक गोल नोंदवताना पेलेचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 13 गोलची आवश्यकता आहे. क्लबसाठी त्याने 724 सामने खेळले. जावी हर्नांडेझच्या 767 सामन्यांपर्यंत पोहोचण्यास मेस्सीला फार काळ लागणार नाही", असे बार्सिलोनाने म्हटले आहे. मेस्सीचा बार्सिलोनाशी 2021 पर्यंत करार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.